HIGHLIGHTS
Vodafone Idea चे स्वस्त आणि मस्त प्लॅन्स
प्लॅनमध्ये 4G हाय-स्पीड डेटा दिला जाईल.
या प्लॅनमध्ये एक महिन्याची वैधता उपलब्ध आहे.
Vodafone Idea ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हे दोन्ही Vi प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर डेटा विभागात सूचीबद्ध केले गेले आहेत. या प्लॅनची किंमत 25 आणि 55 रुपये आहे. यापैकी कोणत्याही प्लॅनचे रिचार्ज केल्याने ऍड फ्री म्युझिकचा ऍक्सेस मिळेल. Vi ने हंगामा म्युझिकसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे कंपनीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत संगीताची सुविधा दिली जात आहे.
Surveyहे सुद्धा वाचा : Samsung Galaxy S22 5G वर भारी सूट, 85 हजार रुपयांचा फोन फक्त 45 हजार रुपयांमध्ये खरेदी करा
25 रुपयांचे Vi डेटा व्हाउचर ग्राहकांना 1.1GB हाय-स्पीड 4G डेटा देते. या डेटाचा 24 तास फायदा घेता येईल. या प्लॅनमध्ये 7 दिवसांसाठी ऍड फ्री म्युझिक देखील उपलब्ध आहे. तुम्हाला ऍड फ्री मुझिकचे सबस्क्रिप्शन नको असल्यास, तुम्ही कंपनीचे 19 रुपयांचे 4G डेटा व्हाउचर देखील घेऊ शकता. या प्लॅनची वैधता देखील 1 दिवसाची आहे.
55 रुपयांच्या Vi रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3.3GB 4G हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 7 दिवसांची आहे. 25 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, यात देखील ऍड फ्री म्युझिक मिळेल, परंतु ग्राहक एका महिन्यासाठी त्याचा लाभ घेऊ शकतात.
आणि जर तुम्हाला म्युझिकचा फायदा नको असेल तर तुम्ही रु. 75 Vi प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमध्ये 7 दिवसांसाठी 6 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, Vi च्या या दोन्ही डेटा व्हाउचरची सदस्यता घेण्यापूर्वी, तुमच्याकडे ऍक्टिव्ह बेसिक प्लॅन असणे आवश्यक आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile