Affordable! नवा स्मार्टफोन Vivo Y200e भारतात अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स। Tech News 

Affordable! नवा स्मार्टफोन Vivo Y200e भारतात अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo ने Y-सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Y200e भारतात लाँच केला.

Vivo Y200e ची विक्री 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

ICICI आणि HDFC बँकेकडून यावर 1000 रुपयांची सूट

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने Y-सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Y200e भारतात लाँच केला आहे. या फोनची डिझाईन खूप स्टयलिश आहे. या फोनमध्ये इको-फायबर लेदर फिनिश आणि 2.5D लाइन टेक्सचर आणि डेकोरेटिव्ह कॅमेरा रिंग आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि केशर या दोन उत्कृष्ट कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट विभागात लाँच केला आहे. जाणून घेऊयात फोनची किंमत आणि ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Good News! 32MP सेल्फी कॅमेरासह येणारा Samsung 5G फोन तब्बल 5000 रुपयांनी स्वस्त, बघा नवी किंमत। Tech News

Vivo Y200e किंमत आणि ऑफर

Vivo Y200E च्या बेस 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. त्याच्या टॉप मॉडेलची म्हणजेच 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या फोनची प्री-बुकिंग देखील सुरू झाली आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y200e ची विक्री 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या फोनवर ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. ICICI आणि HDFC बँकेकडून यावर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, फोनवर 6 महिन्यांपर्यंतची नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे.

Vivo Y200e 5G LAUNCHED IN INDIA
Vivo Y200e 5G India launch

Vivo Y200e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y200e स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल HD+ E4 AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात क्वालकॉमचा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चिप आणि Adreno 613 GPU आहे. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, जी 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये 5G, ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, ब्लूटूथ 5.1, GPS, Glonass आणि USB Type-C पोर्ट आहे.

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo ने नवीन स्मार्टफोन मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये पहिला 50MP सेन्सर आणि दुसरा 2MP पोर्ट्रेट लेन्सचा समावेश आहे. त्याबरोरबच, व्हिडिओ कॉलिंग आणि आकर्षक सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Y200e स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo