Good News! 32MP सेल्फी कॅमेरासह येणारा Samsung 5G फोन तब्बल 5000 रुपयांनी स्वस्त, बघा नवी किंमत। Tech News 

Good News! 32MP सेल्फी कॅमेरासह येणारा Samsung 5G फोन तब्बल 5000 रुपयांनी स्वस्त, बघा नवी किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F54 5G फोनच्या किमतीत मोठी कपात

Samsung Galaxy F54 5G फोनची किंमत थेट 5,000 रुपयांनी कमी केली आहे.

फोटोग्राफीसाठी यात 32MP सेल्फी कॅमेरा आणि 108MP रियर कॅमेरा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी Samsung ने भारतात Samsung Galaxy F54 5G फोन लाँच केला होता. या फोनचे कॅमेरा फीचर्स अगदी जबरदस्त आहेत. 32MP सेल्फी कॅमेरा आणि 108MP रियर कॅमेरासह या फोनद्वारे अप्रतिम फोटोग्राफी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन कंपनीने मिड बजेटमध्ये लाँच केला गेला होता. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने या फोनची किंमत आता थेट 5,000 रुपयांनी कमी केली आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy F54 5G फोनची नवी किंमत-

Samsung Galaxy F54 5G ची नवी किंमत

Samsung Galaxy F54 5G फोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, आता या फोनच्या किमतीत 5,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर, Galaxy F54 5G फोन 24,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy F54 5G

याव्यतिरिक्त, या फोनवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. HDFC वापरकर्त्यांना शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळत आहे. Samsung Axis Bank Signature credit card वर 2500 रुपये आणि Samsung Axis Bank Infinite Credit Card वर 5000 रुपयांची सूट देखील असेल. येथून खरेदी करा

Samsung Galaxy F54 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F54 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले मिळतो. जो सुपर AMOLED + पॅनेलवर बनवला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी Galaxy F54 5G सॅमसंगच्या स्वतःच्या Exynos 1380 octacore प्रोसेसरसह सुसज्ज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 6000 mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. हा मोबाइल F/1.8 अपर्चरसह 108MP प्राथमिक सेन्सरला सपोर्ट करतो, जो OIS फीचर्सने सुसज्ज आहे. यासोबतच बॅक कॅमेरा सेटअपमध्ये 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. त्याबरोबरच, फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo