‘या’ तारखेला लाँच होणार Vivo ची जबरदस्त कॅमेरा फोन सीरीज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

Updated on 14-Nov-2022
HIGHLIGHTS

Vivo पुढील महिन्यात अधिकृतपणे X90 मालिका लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

लाँच पूर्वीच या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

Vivo X90 सीरीज 22 नोव्हेंबरला चीनमध्ये लॉन्च होऊ शकते.

स्मार्टफोन ब्रँड Vivo ने आपली नवीन कॅमेरा फोन सीरीज Vivo X90 Series ची लाँच डेट जाहीर केली आहे. ही सिरीज 22 नोव्हेंबर रोजी जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. या सीरीज अंतर्गत Vivo X90, X90 Pro आणि X90 Pro+ लाँच केले जाऊ शकतात. लाँच आधीच फोनच्या फीचर्सची माहितीही समोर आली आहे. Qualcomm चा Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर Vivo X90 सीरीजच्या टॉप व्हेरिएंट फोनमध्ये उपलब्ध असेल आणि बाकी फोनमध्ये MediaTek Dimensity 9200 प्रोसेसर सपोर्ट असेल.

हे सुद्धा वाचा : Aadhaar Card नवीन नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? बघा करावे लागेल…

लीक्सनुसार, Vivo X90 सीरीज 50,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत दिला जाऊ शकतो. हा फोन 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB, 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB अशा चार स्टोरेज व्हेरिएंटसह येईल.

Vivo X90 सीरीजच्या तीनही फोनमध्ये सुपर AMOLED डिस्प्ले सपोर्ट असेल. Vivo X90 Pro+ मध्ये कर्व एज स्टाईलसह 6.78-इंच लांबीचा Samsung E6 AMOLED डिस्प्ले असेल. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2K असेल आणि रिफ्रेश रेट 120Hz असेल. यामध्ये आय प्रोटेक्शनदेखील मिळेल. 

Vivo X90 Pro + चे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo X90 Pro + चार मागील कॅमेऱ्यांसह ऑफर केले जाईल, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सेल Sony IMX989V सेन्सर आहे. याशिवाय यात 48 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स असेल. यासोबत 50-मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स आणि 64-मेगापिक्सल पेरिस्कोप लेन्स असेल. Vivo V2 इमेज सिग्नल प्रोसेसर देखील कॅमेरासह समर्थित असेल. फोनसोबत आकर्षक सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.

Vivo X90 Pro Plus ला 4,700mAh बॅटरी मिळेल, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :