Vivo X200s आणि Vivo X200 Ultra ‘या’ दिवशी करणार जबरदस्त एन्ट्री, काय मिळेल विशेष?

Updated on 07-Apr-2025
HIGHLIGHTS

Vivo च्या नवीनतम Vivo X200s आणि Vivo X200 Ultra तारीख जाहीर

येत्या 21 एप्रिल 2025 रोजी हे दोन्ही फोन बाजारात लाँच केले जातील.

स्मार्टफोन्ससह Vivo Pad5 Pro, Pad SE आणि Watch5 चेही अनावरण केले जाईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या नवीनतम Vivo X200s आणि Vivo X200 Ultra ची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अखेर ब्रँडने या फोनची लाँच तारीख जाहीर केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ‘या’ महिन्यात जागतिक स्तरावर लाँच केले जातील. एवढेच नाही तर, स्मार्टफोन्ससह Vivo Pad5 Pro, Pad SE आणि Watch5 चेही अनावरण केले जाईल. यासह तुम्हाला अनेक नवीनतम स्पेक्स पाहायला मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता Vivo X200s आणि Vivo X200 Ultra चे लॉन्चिंग आणि इतर सर्व तपशील-

Also Read: OnePlus 12 5G Discount: तब्बल 6000 रुपयांच्या सवलतीसह मिळतोय जबरदस्त फोन, मिळेल 64MP कॅमेरा

Vivo X200s आणि Vivo X200 Ultra चे भारतीय लॉन्चिंग

Vivo कंपनीच्या म्हणण्यानुसार Vivo X200s आणि Vivo X200 Ultra फोन या महिन्यात लाँच केले जातील. येत्या 21 एप्रिल 2025 रोजी हे फोन बाजारात लाँच केले जातील. याव्यतिरिक्त, या फोन्ससोबत टॅबलेट आणि स्मार्टवॉच देखील लाँच केले जाणार आहेत. मात्र, हे उपकरण भारतीय बाजारात लाँच केले जाईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Vivo X200s चे लीक तपशील

ताज्या लीकनुसार, Vivo X200S मध्ये फ्लॅट डिस्प्ले येईल, ज्याचा आकार 6.67 इंच, रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. फोटोग्राफीसाठी, यात Zeiss ने बनवलेला 50MP कॅमेरा, अल्ट्रा-सॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि डायमेन्सिटी 9400+ चिप असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा Vivo स्मार्टफोन 6200mAh बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. यात 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे.

Vivo X200 Ultra चे लीक तपशील

अधिकृत टिझरनुसार, Vivo X200 Ultra ला क्लीन व्हाईट फिनिशिंग मिळेल. या फोनच्या मागच्या बाजूला व्हर्टिकल स्ट्राइप आहेत, जे सुंदर दिसतात. लीकनुसार, हा स्मार्टफोन 200MP कॅमेरा आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसह येईल. या फोनमध्ये VS1 आणि V3+ चिप्स उपलब्ध असतील. हे चांगले फोटो क्लिक करण्यास मदत करेल. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी या फोनला IP68/69 रेटिंग देखील मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :