प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या Vivo X200 Ultra स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून टेक विश्वात सुरु आहे. अखेर Vivo X200 Ultra फोन टेक विश्वात लाँच करण्यात आला आहे. हे कंपनीच्या Vivo X200 सिरीजमधील नवीनतम फ्लॅगशिप मॉडेल आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo फोनमध्ये Zeiss ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 200MP टेलिफोटो सेन्सर आहे. यासह फोनमध्ये अनेक पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Vivo X200 Ultra फोनची किंमत आणि संपूर्ण तपशील-
Also Read: Finally! मोठ्या बॅटरीसह लेटेस्ट Oppo K13 5G अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप फीचर्स
कंपनीने चीनमध्ये Vivo X200 Ultra फोन लाँच केला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने हा फोन CNY 6,499 म्हणजेच सुमारे 75,500 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केला आहे. ही किंमत फोनच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तसेच, फोनच्या 16GB+ 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 चिनी युआन म्हणजेच अंदाजे 84,000 रुपये आहे. अखेर टॉप 16GB+ 1TB व्हेरिएंटची किंमत 7,999 चिनी युआन म्हणजेच सुमारे 92,000 रुपये इतकी आहे.
Vivo X200 Ultra फोन 6.82 इंच लांबीच्या 8T LTPO AMOLED डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंग या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 16GB LPDDR5X RAM सपोर्टसह येतो. फोनला पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी, यात 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
फोटोग्राफीसाठी Vivo X200 Ultra फोनमध्ये 50MP 1/1.28-इंच लांबीचा सोनी LYT-818 35 मिमीचा प्राथमिक कॅमेरा आहे. त्यासोबतच, यात 50MP 14 मिमी 1/1.28-इंच सोनी LYT-818 अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये 200MP 85mm Zeiss APO टेलिफोटो सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासोबत तुम्हाला 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. यात 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.