आगामी Vivo X Fold3 Pro फोनची भारतीय लाँच डेट जाहीर, जबरदस्त फीचर्ससह लवकरच होणार दाखल! 

आगामी Vivo X Fold3 Pro फोनची भारतीय लाँच डेट जाहीर, जबरदस्त फीचर्ससह लवकरच होणार दाखल! 
HIGHLIGHTS

आगामी Vivo X Fold 3 Pro ची भारतीय लाँच डेट जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे या फोनमध्ये Zeiss ने बनवलेला कॅमेरा सेटअप दिला जाईल.

Vivo ने आपल्या अधिकृत X हॅन्डलवरून पोस्ट शेअर करत Vivo X Fold 3 Pro च्या भारतीय लाँचबद्दल दिली माहिती

Vivo X Fold 3 Pro India launch: फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या वाढत्या ट्रेन्डसोबत स्मार्टफोन निर्माता अनेक नवनवीन फोल्डेबल फोन्स टेक विश्वात दाखल करत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने आगामी Vivo X Fold 3 Pro ची भारतीय लाँच डेट जाहीर केली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे फ्लॅगशिप डिवाइस भारतापूर्वी चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. Vivo X Fold3 Pro स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजेच जूनच्या सुरुवातीला सादर केला जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता Vivo X Fold3 Pro भारतीय लॉन्चिंग डिटेल्स.

Also Read: 12GB RAM आणि 50MP कॅमेरासह POCO F6 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स। Tech News

Vivo X Fold3 Pro चे भारतीय लाँच

Vivo ने आपल्या Vivo India अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनुसार Vivo X Fold3 Pro 6 जून 2024 ला लाँच केला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, अधिकृत यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया अकाऊंटवर या फोनच्या लॉन्च इव्हेंटची लाईव्ह स्ट्रीम पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये Zeiss ने बनवलेला कॅमेरा सेटअप दिला जाईल.

Vivo X Fold3 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, Vivo X Fold3 Pro फोन चीनच्या बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8.03 इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो फोल्ड झाल्यानंतर 6.53 इंच लांबीचा होईल. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटच्या समर्थनासह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात Snapdragon 8 Gen 3 चिप, 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. यात Vivo V3 इमेजिंग चिप देखील आहे. तसेच, फोनमध्ये सिक्योरिटी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.

vivo x fold3 processor

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo X Fold3 Pro फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP मेन, 50MP अल्ट्रा वाइड आणि 64MP टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 50MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा कॅमेरा सेटअप Zeiss ने तयार केला आहे. कंपनीने या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 5700mAh ची मजबूत बॅटरी दिली आहे. यात 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल.

कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, Wi-Fi, GPS, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट आहे. Vivo X Fold 3 Pro च्या चिनी व्हेरिएंटप्रमाणेच भारतीय स्पेसीफिकेशन्स देखील असतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo