बजेट स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध Poco कंपनीने नुकतेच आपला नवा स्मार्टफोन Poco F6 स्मार्टफोन लाँच केला आहे. मात्र, हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला गेला आहे. Poco च्या नवीनतम स्मार्टफोनमध्ये अनेक शक्तिशाली फिचर्स देण्यात आले आहेत. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 50MP कॅमेरा, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात POCO F6 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
कंपनीने POCO F6 स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे. तर, फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 31,999 रुपये आहे. याशिवाय, टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजची किंमत 33,999 रुपये इतकी आहे.
उपलब्धतेबद्दल बोलयचे झाल्यास, POCO F6 फोनची विक्री येत्या 29 मे रोजी दुपारी 12 वाजता Flipkart वर सुरू होईल. पहिल्या सेल दरम्यान हा फोन अनुक्रमे 25,999 रुपये, 27,999 रुपये आणि 29,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
POCO F6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
POCO F6 फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन देण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन Snapdragon 8s Gen3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. गेमिंग दरम्यान फोन थंड ठेवण्यासाठी यात POCO IceLoop सिस्टम देखील देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile