Realme GT 6T Vs Motorola Edge 50 Fusion: नुकतेच लाँच झालेल्या लेटेस्ट स्मार्टफोन्समधून कोणता खरेदी करावा? बघा सर्व डिटेल्स

Realme GT 6T Vs Motorola Edge 50 Fusion: नुकतेच लाँच झालेल्या लेटेस्ट स्मार्टफोन्समधून कोणता खरेदी करावा? बघा सर्व डिटेल्स
HIGHLIGHTS

लेटेस्ट Motorola Edge 50 Fusion फोन 16 मे 2024 रोजी लाँच झाला होता.

Realme GT 6T स्मार्टफोन 22 मे 2024 रोजी लाँच करण्यात आला होता.

हे दोन्ही स्मार्टफोन मिड-बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत.

भारतीय टेक बाजारपेठेत नुकतेच दोन जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स त्यांच्या उत्कृष्ट फीचर्समुळे चर्चेत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, लेटेस्ट Motorola Edge 50 Fusion फोन 16 मे 2024 रोजी लाँच झाला होता. तर, दुसरा Realme GT 6T स्मार्टफोन 22 मे 2024 रोजी लाँच करण्यात आला होता. हे दोन्ही स्मार्टफोन मिड-बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन्सची किंमत आणि तपशील जाणून घेउयात, जेणेकरून तुमच्यासाठी योग्य फोनची निवड करणे सोपे जाईल.

Motorola Edge 50 Fusion आणि Realme GT 6T ची किंमत

Motorola Edge 50 Fusion फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच करण्यात आला आहे. फोनचा 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची किंमत 22,999 रुपये. तर, फोनच्या 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजची किंमत 24,999 रुपये आहे.

दुसरीकडे, Realme GT 6T च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. तर, फोनच्या 8GB + 256GB वेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. याशिवाय, या फोनच्या 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 35,999 रुपये आणि 12GB + 512 GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे.

Motorola-Edge-50-Fusion launched in India
Motorola-Edge-50-Fusion launched in India

Motorola Edge 50 Fusion आणि Realme GT 6T चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Motorola Edge 50 Fusion मध्ये 144Hz रीफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा कर्व डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले ग्लास 5 संरक्षणास समर्थन देतो. Realme GT 6T मध्ये 6.78-इंच लांबीचा LTPO 3D कर्व डिस्प्ले आहे, जो 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी Gorilla Glass Victus 2 संरक्षण दिले गेले आहे.

प्रोसेसर

Motorola Edge 50 Fusion मध्ये कार्यक्षमतेसाठी Qualcomm चा पॉवरफुल Snapdragon 7s Gen 2 चिपसेट या फोनमध्ये जोडला गेला आहे. या चिपमुळे हा फोन हेवी टास्क आणि स्मूथ गेमिंग अनुभव देईल. Realme GT 6T मध्ये परफॉर्मन्ससाठी Snapdragon 7 Plus Gen 3 चिपसेट आहे. एवढेच नाही तर, या फोनमध्ये 9 लेझर आय व्हेपर कूलिंग सिस्टम देखील आहे.

कॅमेरा

Motorola Edge 50 Fusion मध्ये 50MP Sony-LYTIA 700C प्रायमरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच. यामध्ये 13MP चा मायक्रो व्हिजन सेन्सर देखील आहे.सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme GT 6T
Realme GT 6T

Realme GT 6T मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सह 50MP Sony LYT प्राथमिक सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल शूटर आहे. सेल्फीसाठी, या डिव्हाइसमध्ये 32MP Sony IMX615 सेन्सर मिळेल.

बॅटरी

Motorola Edge 50 Fusion मध्ये 68W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. तर, Realme GT 6T मध्ये 120W SuperVooc चार्जिंग सपोर्टसह मोठी 5,500mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 26 मिनिटात फुल चार्ज होऊ शकतो.

निष्कर्ष

वरील दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत बघता Motorola Edge 50 Fusion फोन Realme GT 6T पेक्षा तुमच्यासाठी जास्त परवडणारा आहे. या फोनमध्ये युजरसाठी सर्व महत्त्वाचे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. तर, Realme GT 6T मध्ये महत्त्वाच्या फीचर्ससह काही विशेषता देखील जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे, जर तुम्ही नवा फोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, तुमच्या गरज आणि बजेट बघून फोन बेस्ट फोन निवडा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo