नवा Realme GT 6T भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स। Tech News 

नवा Realme GT 6T भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स। Tech News 
HIGHLIGHTS

नवा Realme GT 6T स्मार्टफोन कंपनीने भारतात लाँच केला आहे.

Realme GT 6T मध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Realme GT 6T फोनची विक्री Amazon India वर 29 मे पासून सुरू होईल.

गेल्या काही काळापासून Realme च्या नव्या Realme GT 6T फोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. कंपनीने आज आपल्या ‘GT’ सिरीजमध्ये एक नवीन मोबाईल भारतात सादर केला आहे. होय, Realme GT 6T कंपनीने भारतात लाँच केला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 प्रोसेसर आणि 12GB RAM सारख्या पॉवरफुल फीचर्ससह येतो. चला तर मग जाणून घेऊयात Realme GT 6T ची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: Tips: श्श! तुमच्या फोनमध्ये सुद्धा ‘हे’ बदल दिसत आहेत का? लगेच व्हा सतर्क, अन्यथा होईल मोठे नुकसान। Tech News

Realme GT 6T ची किंमत

Realme GT 6T फोन भारतात 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB अशा चार व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 26,999 रुपये, 29,999 रुपये आणि 33,999 रुपये इतकी आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री Amazon India वर 29 मे पासून सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, एक्सचेंज ऑफरसह यावर 2000 रुपयांची सूट मिळेल.

Realme GT 6T चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme GT 6T मध्ये 6.78 इंच लांबीचा LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी यात गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 देखील आहे. त्याबरोबरच. उत्तम परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 प्रोसेसर आहे. फोनमधील डेटा सुरक्षेसाठी या हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन देखील आहे.

Realme-GT-6T-Charge-and-Chipset
Realme-GT-6T-Charge-and-Chipset

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. यासोबतच सेटअपमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स उपलब्ध आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 32MP कॅमेरा देखील आहे. पॉवरसाठी, Realme GT 6T मध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB-C पोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo