Vivo V50e 5G Price leaked ahead of India Launch Date 10 April
Vivo च्या आगामी Vivo V50e स्मार्टफोनच्या आगामी फोनची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आता अखेर या फोनची भारतीय लाँच तारीख निश्चित करण्यात आली आहे. यासह, फोन Vivo V50 सिरीजचे विस्तार करत आहे. कंपनीने अलीकडेच या सिरीजअंतर्गत पहिला फोन Vivo V50 लाँच केला होता. मात्र, आता कंपनी नवीन Vivo V50e सादर करत आहे.
Also Read: म्युझिक लव्हर्ससाठी HMD 130 Music आणि HMD 150 Music नवे फिचर फोन लाँच! जाणून घ्या किंमत
आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनची लाँचिंग आधीच टीझ केली गेली आहे. आता त्याची लाँच तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. हा फोन अल्ट्रा-स्लिम कर्व डिस्प्लेसह येतो, जो खूप स्लिम असणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo V50e ची भारतीय लाँच डेट-
Vivo India च्या अधिकृत X हँडल म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरद्वारे Vivo V50e फोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात पुढील आठवड्यात म्हणजेच येत्या 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. तसेच, उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री Flipkart द्वारे सुरू होईल.
कंपनीने आधीच अधिकृत साईटवर Vivo V50e ची डेडिकेटेड मायक्रोसाईट लाईव्ह केली आहे. पाण्याच्या प्रतिकारासाठी, Vivo V50e फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळेल. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा असेल. त्याच वेळी, फोटोग्राफीसाठी मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. या फोनमध्ये पाण्याखालील फोटोग्राफीचा सपोर्ट देखील उपलब्ध असेल.
तसेच, लीकनुसार या फोनमध्ये 6.77 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले असू शकतो, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. त्याबरोबरच, सुरळीत कामकाजासाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर असू शकतो. स्टोरेज सेक्शनमध्ये यात 8GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट असू शकतो. तर पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5600mAh बॅटरी मिळू शकते, जी 90W फास्ट चार्जिंगचा सपोर्टसह येईल.