Buy Best 5G Smartphones under Rs 15000 Realme Vivo CMF from Amazon deal
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने आज आपला लेटेस्ट Vivo T4x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. आम्ही तुमाला सांगतो की, या फोनमध्ये रिंग लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. हा फोन या सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये सर्वात मोठा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo T4x 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या स्वस्त Vivo फोनद्वारे धमाल फोटोग्राफी करा, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी
Vivo T4x 5G फोनची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत आहे, जो 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. त्याबरोबरच, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये या फोनवर 1000 रुपयांची फ्लॅट सूट मिळेल. लक्षात घ्या की, ही ऑफर AXIS आणि HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास दिली जाईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Vivo ई-स्टोअर आणि Flipkart वर फोनची सेल सुरू होईल. हा स्मार्टफोन प्रोंटो पर्पल आणि मरीन ब्लू या कलर ऑप्शन्ससह येतो.
Vivo T4x 5G स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेचे पिक्सेल रिझोल्यूशन 2408x 1080 इतके आहे. यासह पीक ब्राइटनेस १०५० Nits आहे.
स्मूथ परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासह स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित OS वर चालतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ऑटो फोकससह 50MP AI मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये दुसरा 2MP सेन्सर देखील उपलब्ध आहे. तसेच, या फोनमध्ये रिंग लाईट आणि फ्लॅश देखील देण्यात आला आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी, यात नाईट, पोर्ट्रेट, पामो, डॉक्युमेंट्स, स्लो मोशन, प्रो आणि लाईव्ह फोटो सारखी फीचर्स आहेत.
पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फ्लॅशचार्ज सपोर्ट आहे. यासह फोनमध्ये सुपर बॅटरी सेव्हर मोड देखील देण्यात आला आहे. हा फोन 40 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक वेळ मिळेल.