Vivo चा 10,000 रुपयांपेक्षा स्वस्तात येणारा मस्त स्मार्टफोन, मिळतील अगदी आकर्षक फीचर्स

Vivo चा 10,000 रुपयांपेक्षा स्वस्तात येणारा मस्त स्मार्टफोन, मिळतील अगदी आकर्षक फीचर्स
HIGHLIGHTS

Vivo Y01A स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार

स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता

जाणून घ्या स्मार्टफोनचे संभाव्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y01A स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असल्याचे सांगितले जात आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर हा फोन पाहण्यात आला आहे. जरी BIS इंडिया सूचीने स्मार्टफोनचे कोणतेही वैशिष्ट्य अद्याप उघड केले नसले तरी, प्लॅस्टिक बॅकसह 6.51-इंच लांबीचा डिस्प्ले असल्याचे म्हटले जाते. हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 SoC द्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. Vivo Y01Aमध्ये मागे 8-मेगापिक्सेल कॅमेरा आणि फ्रंटला 5-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : WhatsAppमध्ये येतंय अप्रतिम फीचर, आता तुमचा डिजिटल अवतार तुमच्या जागी करेल काम

Vivo Y01A ची भारतात संभाव्य किंमत 

MySmartPrice च्या अहवालानुसार, Vivo लवकरच Vivo Y01A स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे, कारण हा स्मार्टफोन मॉडेल क्रमांक V2166 सह BIS इंडिया सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. हा स्मार्टफोन विवोच्या Y-सीरीजमधील बजेट हँडसेट असल्याचे सांगितले जात आहे. अहवालात असे म्हटले आहे की, स्मार्टफोनची किंमत भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

फीचर्स आणि सेप्सिफिकेशन्स 

लिस्टिंगमध्ये Vivo Y01A चे कोणतेही फीचर्स उघड झाले नाहीत, परंतु एका दुसर्‍या अहवालात हँडसेटचे काही फीचर्स उघड झाले आहेत. स्मार्टफोनमध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.51-इंच डिस्प्ले आणि प्लास्टिक बॅक असण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोन MediaTek Helio P35 SoC द्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. यामध्ये मागील बाजूस 8-मेगापिक्सेल शूटर आणि फ्रंटला 5-मेगापिक्सेल सेल्फी शूटर असू शकतो.

Vivo Y01A भारतात ब्लॅक आणि ब्लू या दोन कलर ऑप्शन्समध्ये येण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये 1GB व्हर्च्युअल रॅम, 2GB रॅम आणि 32GB इनबिल्ट स्टोरेजची सुविधाही आहे. अहवालात असे म्हटले आहे की, भारतात येण्यापूर्वी हँडसेट इतर ठिकाणी लाँच होऊ शकतो.

Vivo Y01 

गेल्या वर्षी मे मध्ये, Vivo ने Vivo Y01 भारतात MediaTek Helio P35 SoC आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच केला होता. स्मार्टफोनमध्ये HD+ रिझोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.51-इंच लांबीचा Halo FullView डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo