WhatsAppमध्ये येतंय अप्रतिम फीचर, आता तुमचा डिजिटल अवतार तुमच्या जागी करेल काम

WhatsAppमध्ये येतंय अप्रतिम फीचर, आता तुमचा डिजिटल अवतार तुमच्या जागी करेल काम
HIGHLIGHTS

WhatsAppमध्ये येतंय iPhone सारखा जबरदस्त फिचर

व्हिडिओ कॉल दरम्यान युजर्सची व्हर्च्युअल अवतार दिसेल

Avatar Editor चा देखील मिळेल ऑप्शन

मेसेजिंग ऍप WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे यूजर्स व्हिडिओ कॉल दरम्यान त्यांचा व्हर्च्युअल अवतार दाखवू शकतील. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, यूजर्सना व्हॉट्सऍपवरील व्हिडिओ कॉल स्क्रीनमध्ये एक नवीन पर्याय दिसेल.

हे सुद्धा वाचा : Airtelचा सर्वात स्वस्त प्लॅन ! फॅमिली प्लॅनमध्ये मिळेल 340 GB डेटा, मोफत कॉल, SMS आणि OTT लाभ

या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या जागी तुमचा कार्टूनसारखा अवतार दिसेल. WhatsApp स्वतः मेमोजी/बिटमोजीचा संच तयार करत आहे, असे चित्र दिसत आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की, Apple iPhone आणि डिव्‍हाइसेसमध्‍ये असेच फिचर आधीपासूनच उपलब्‍ध आहे. हा व्हर्चुअल अवतार तुम्ही हसल्यावर हसतो आणि तुमच्या हावभावानुसार वागतो.

अहवालानुसार, " जर आपण "Switch to avatar" वर टॅप करण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही.  कारण या फिचरवर अजूनही काम सुरु आहे. म्हणूनच सध्या व्हिडिओ कॉलवर हा पर्याय येण्याची अपेक्षा करता येणार नाही. " अँड्रॉईड बीटा व्हर्जनसाठी व्हॉट्सऍपवर हे फिचर दिसले आहे. अहवालात हे वैशिष्ट्य दाखवण्यासाठी स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

स्टिकर म्हणून देखील होईल वापर 

विशेष म्हणजे व्हॉट्सऍप वापरकर्ते त्यांच्या चॅट्स आणि ग्रुप्समध्ये त्यांचा अवतार स्टिकर म्हणून देखील पाठवू शकतील. त्यांचा अवतार तयार करण्यासाठी, वापरकर्त्यांना एक वेगळा Avatar Editor दिला जाईल, जिथे ते अवतार कस्टमाइज आपल्या सारखा बनवण्यास सक्षम असतील. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo