Vivo V50 to launch in india soon check 5 best before
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच आपल्या आगामी स्मार्टफोन लॉन्चिंगची घोषणा केली आहे. होय, चिनी स्मार्टफोन दिग्गज कंपनी देशात आणखी एक नवीन फोन Vivo V50 लाँच करण्याची योजना करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या काही दिवसांपासून Vivo V50 बद्दलचे लीक ऑनलाईन जिकडे तिकडे उघड केले जात आहेत. ताज्या अहवालात या स्मार्टफोनची किंमत देखील लीक करण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo V50 फोनची किंमत तुमच्या बजेटमध्ये बसेल की नाही?
Also Read: Upcoming Smartphones in February 2025: पुढील महिन्यात लाँच होऊ शकतात अप्रतिम स्मार्टफोन, पहा यादी
प्रसिद्ध अभिषेक यादव टिपस्टर आगामी Vivo V50 फोनच्या किमतीबद्दल एक लीक शेअर केला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, Vivo V50 ची किंमत कदाचित 37,999 रुपयांच्या आसपास असेल आणि ती निश्चितच 40,000 रुपयांच्या अंतर्गत असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Vivo V40 ची सुरुवातीची किंमत 8GB RAM/128GB स्टोरेज मॉडेलसाठी 34,999 रुपये इतकी होती.
टिपस्टर अभिषेक यादव यांनी केवळ किंमतच नाही तर, फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स देखील उघड केले आहेत. ताज्या लीकनुसार, आगामी Vivo V50 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा क्वाड-कर्व्ह डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 प्रोसेसरने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. हा फोन IP68 आणि IP69 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग देखील देऊ शकतो.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, लीकनुसार या फोनच्या मागील बाजूस ड्युअल 50MP सेटअप असू शकतो. परंतु टिपस्टरने दुसरा सेन्सर टेलिफोटो लेन्स असेल की, अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स असेल याबद्दल स्पष्ट माहिती दिली नाही. आकर्षक सेल्फीसाठी फोनच्या समोर 50MP शूटर असण्याची अपेक्षा आहे. तसेच, आगामी V50 मध्ये बॅटरी विभागात मोठा अपग्रेड मिळण्याची अपेक्षा आहे. हा फोन 6,000mAh बॅटरीसह येण्याची शक्यता आहे. फोन 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. मात्र, लक्षात घ्या की, आगामी Vivo V50 ची योग्य किंमत आणि कन्फर्म स्पेसिफिकेशन्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.