Vivo V50
प्रसिद्ध आणि शीर्षस्थानी असलेली स्मार्टफोन निर्माता Vivo च्या आगामी Vivo V50 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या लाइनअपमध्ये Vivo V50 आणि Vivo V50 Pro यांचा समावेश असेल. अखेर कंपनीने Vivo V50 स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट शेअर केली आहे. हा स्मार्टफोन फेब्रुवारीच्या मध्यात भारतीय बाजारात दाखल होणार आहे. तसेच, अधिक काळापासून या फोनची किंमत आणि तपशिलांबद्दल अधिकतर माहिती लीक झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo V50 ची किंमत आणि तपशील-
Vivo India ने आपल्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत Vivo V50 च्या भारतीय लाँच डेटची माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Vivo V50 स्मार्टफोन येत्या 17 फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाईल, दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन भारतात दाखल होईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, ताज्या लीकनुसार Vivo V50 ची किंमत 37,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर, टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे 40,000 रुपये असू शकते. लक्षात घ्या की, हे डिव्हाइस रोझ रेड, स्टारी ब्लू आणि टायटॅनियम ग्रे कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
ताज्या लीकनुसार, प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या आगामी Vivo V50 मध्ये 6.7-इंच लांबीचा क्वाड-कर्व्हड AMOLED पॅनल असेल. जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो शकतो. तर, चांगल्या परफॉर्मन्ससाठी, अंतर्गत, हा फोन स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चिपसेटसह येण्याची शक्यता आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह पॉवर मिळू शकते.
तसेच लीकनुसार, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 90W चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी सपोर्ट मिळेल. त्याबरोबरच, या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी शूटर आणि 50MP चा अल्ट्रावाइड सेन्सर असेल. सेल्फीसाठी, डिव्हाइसमध्ये 50MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा असू शकतो. यात झीस मल्टीफोकल पोर्ट्रेट, वेडिंग पोर्ट्रेट स्टुडिओ आणि AI स्टुडिओ लाईट पोर्ट्रेट 2.0 सारखे फीचर्स असू शकतात. महत्त्वाचे लक्षात घ्या की, या फोनची खरी किंमत आणि कन्फर्म तपशील फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.