गेल्या काही दिवसांपासून Vivo T4x 5G च्या भारतीय लाँचची चर्चा सुरु आहे. कंपनीने अलीकडेच विवो V50 फोन लाँच केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने अद्याप लाँचिंगची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही, परंतु त्यांनी आगामी फोनच्या डिझाइनची झलक अधिकृतपणे उघड केली आहे. मागील लीक्स आणि अहवालांनुसार, स्मार्टफोन या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या बॅटरीसह येण्याचा दावा केला जातो. हा फोन Vivo T3x 5G ची जागा घेणार आहे, जो मागील वर्षी एप्रिलमध्ये लाँच करण्यात आला होता. जाणून घेऊयात Vivo T4x 5G बद्दलचे सर्व तपशील-
Vivo India ने आपल्या अधिकृत X अकाउंटद्वारे एक पोस्ट शेअर करत Vivo T4x 5G च्या डिझाइनबद्दल माहिती दिली. पोस्टसह एक इमेज देखील कंपनीने शेअर केली आहे. तुम्ही पाहू शकता की, इमेजमध्ये हँडसेटचा मागील पॅनल सर्क्युलर एजेस असलेल्या आयताकृती कॅमेरा मॉड्यूलसह दिसतो. त्याबरोबरच, कॅमेरा आयलंडवर दोन सेन्सर आणि एक स्क्विर्कल डायनॅमिक लाईट फिचर दिसत आहे.
मागील अधिकृत टीझरमध्ये असे स्पष्ट केले गेले की, आगामी Vivo T4x 5G त्याच्या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या बॅटरीसह येईल. या फोनमध्ये 6500mAh बॅटरी असू शकते. ज्याची किमत 15000 रुपयांअंतर्गत असू शकते. भारतात Vivo T4x 5G फ्लिपकार्ट, Vivo ई-स्टोअर आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल. तो मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 SoC द्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे.
त्याबरोबरच, लीकनुसार Vivo T4x 5G मध्ये 50MP चा प्रायमरी रिअर सेन्सर असू शकतो. यात AI Erase, AI फोटो एन्हांस आणि AI डॉक्युमेंट मोड सारख्या AI फीचर्स मिळतील, अशी अपेक्षा आहे. हा हँडसेट मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी आणि IR ब्लास्टरसह येण्याची शक्यता आहे. हा फोन प्रोंटो पर्पल आणि मरीन ब्लू कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाऊ शकतो.