vivo t4x price leak
Vivo T4x इंडिया लाँच: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच Vivo V50 फोन भारतात लाँच केला आहे. दरम्यान, कंपनी आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून Vivo T4x 5G च्या भारतीय लाँचची चर्चा सुरु आहे. हा स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. खरं तर, फोनची अधिकृत लाँच तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरीही, कंपनीने डिव्हाइसच्या काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती उघड करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, आगामी फोनबद्दल अनेक लीक्स देखील पुढे येत आहेत. जाणून घेऊयात सर्व काही-
Also Read: Realme P3 Pro 5G Sale: अंडरवॉटर मोडसह येणाऱ्या लेटेस्ट फोनची भारतात पहिली सेल, जाणून घ्या Best ऑफर्स
जर आपण ताज्या लीक्सवर विश्वास ठेवला तर, भारतात Vivo T4x ची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. म्हणजेच नवा स्मार्टफोन प्रत्येकाच्या बजेटमध्ये येणाऱ्या किमतीत सादर केला जाईल, असा अंदाज आहे. मात्र, फोनची खरी किंमत हा फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल. Vivo T4x हा फोन प्रोंटो पर्पल आणि मरीन ब्लू या फोन कलर ऑप्शन्समध्ये येऊ शकतो.
सर्वप्रथम फोनच्या कॅमेरा तपशिलांबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 50MP AI प्रायमरी लेन्स मिळू शकेल. त्याचा कॅमेरा सेटअप AI इरेजर, AI फोटो एन्हांस आणि AI डॉक्युमेंट मोड सारख्या एआय फीचर्ससह येण्याची अपेक्षा आहे. याद्वारे वापरकर्त्यांना एक चांगला फोटोग्राफी अनुभव मिळेल. विशेष म्हणजे Vivo T4x मध्ये डायनॅमिक लाइट फीचर असू शकतो, जो मोबाईल उलटा ठेवला असल्यास सूचनांसाठी कस्टम लाइटिंग इफेक्ट्स देईल.
तसेच, फोनच्या बॅटरीबद्दल देखील माहिती उघड झाली आहे. या फोनमध्ये ‘या सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी’ असेल, असा दावा कंपनीने केला आहे. लक्षात घ्या की, कंपनीने अधिकृत टीझरमध्ये असेही उघड केले आहे की, यात 6500mAh बॅटरी असेल, जी Vivo T3x वरील 6000mAh बॅटरीपेक्षा खरोखरच एक शक्तिशाली अपग्रेड आहे. मागील फोनच्या 44W फास्ट चार्जिंगसह सादर केला गेला आहे. फोनचे लाँच जवळ येताना या फोनबद्दल अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.