Vivo T4x 5G teaser
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा Vivo V50 फोन भारतात आज दाखल होणार आहे. दरम्यान, कंपनीचा आगामी स्मार्टफोन Vivo T4X 5G देखील काही काळापासून त्याच्या लाँचिंगबाबत बातम्यांमध्ये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आता या उपकरणाची मायक्रो साइट शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सूचिबद्ध करण्यात आली आहे. यासह, भारतात Vivo T4X 5G हँडसेटचे लाँचिंग निश्चित झाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo T4X 5G चे लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: Upcoming Mobile Phones This Week: या आठवड्यात भारतात लाँच होणार Vivo, Realme चे भारी स्मार्टफोन्स
Flipkart वरील सक्रिय मायक्रोसाइटनुसार Vivo T4X 5G लवकरच लाँच केला जाईल. तसेच, हे डिव्हाइस या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या बॅटरीसह येईल, असे देखील कंपनीने दावा केला आहे. परंतु फोनचे फीचर्स अद्याप उघड झालेले नाहीत. येत्या काही दिवसांत या डिव्हाइसची किंमत आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित माहिती शेअर केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
ताज्या लीक्स आणि रिपोर्टनुसार, Vivo च्या आगामी स्मार्टफोनमध्ये 6500mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली जाऊ शकते. या हँडसेटमध्ये AMOLED डिस्प्ले आणि मीडियाटेक प्रोसेसर मिळू शकतो. त्याबरोबरच, हा मोबाईल फोन अँड्रॉइड 15 वर कार्य करेल. तसेच, नवीनतम लीकमध्ये Vivo T4X 5G स्मार्टफोनमध्ये नोटिफिकेशन्ससाठी डायनॅमिक लाइटची सुविधा दिली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.
ताज्या रिपोर्ट्सनुसार, Vivo T4x 5G भारतात चांगल्या परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimensity 7300 चिपसेटसह येऊ शकतो. अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की, त्यात खूप मजबूत परफॉर्मन्स असेल. Vivo T4X 5G इंडियाचा AnTuTu स्कोअर 728000 गुण असल्याचे म्हटले जाते. यामुळे, त्यात उत्तम AI फीचर्स असण्याची अपेक्षा आहे. हा फोन Flipkart साईटवर सूचिबद्ध करण्यात आला आहे, त्यामुळे उपलब्धतेबद्दल अंदाज लावला जाऊ शकतो. मात्र, फोनची खरी किंमत आणि इतर सर्व तपशील फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.