Lava Yuva 3 Pro to launch in India on Dec 14: Expected specs, price & more
2023 हा वर्ष संपायला आता अबघे काही दिवस उरले आहेत. या वर्षी अनेक जबरदस्त Smartphones आणि अनेक नवीन फीचर्स आणि टेक्नॉलॉजी सादर करण्यात आल्या आहेत. मात्र, ही लाट अजूनही सुरूच आहे, कारण या आठवड्यात देखील भारतात अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. हा आठवडा भारतात स्मार्टफोन लाँचच्या नावे होणार आहे. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेले स्मार्टफोन्स लाँच होण्यासाठी सज्ज झाले आहेत. संपूर्ण यादी बघा.
iQOO 12 स्मार्टफोन आज 12 डिसेंबर 2023 रोजी भारतात लाँच होणार आहे. भारतापूर्वी चीनमध्ये हा फोन लाँच केला गेला आहे. iQOO 12 फोनमध्ये 6.78 इंच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सारखी फीचर्स मिळतील, अशी अपेक्षा आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये नवीन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर म्हणून असेल, याबाबत पुष्टी करण्यात आली आहे.
Lava Yuva 3 Pro स्मार्टफोन भारतात दोन दिवसांनी म्हणजेच 14 डिसेंबर 2023 रोजी लाँच होईल. अलीकडेच कंपनीने एका टीझर व्हिडिओद्वारे फोनच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. टीझर व्हिडिओमध्ये फोनचा फर्स्ट लुक दिसला आहे, ज्याच्या मागील बाजूस डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि गोल्ड कलर ऑप्शन दिसला आहे. या फोनच्या फीचर्सची पुष्टी लाँचच्या वेळी केली जाईल.
Poco C65 स्मार्टफोन 15 डिसेंबर 2023 रोजी भारतात लाँच होईल. फोनची विक्री Flipkart वर उपलब्ध असेल. Poco C65 फोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले, MediaTek Helio G85 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो.
Realme C67 5G स्मार्टफोन भारतात 14 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. मात्र, लाँचपूर्वी फोनचे डिझाईन, कलर आणि काही फीचर्सच्या तपशीलांची पुष्टी झाली आहे. हा फोन ग्रीन कलर ऑप्शनमध्ये दाखल होणार. यात 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एक सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल उपलब्ध असेल.