Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, बघा यादी

HIGHLIGHTS

या आठवड्यात Realme, Motorola, Oneplus इ. स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच होणार

Motorola Edge 50 Ultra फोन भारतात 18 जून रोजी लाँच होणार आहे.

कंपनी भारतात Realme GT 6 स्मार्टफोन 20 जून रोजी लाँच करणार

जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात अनेक भारी स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, जून महिना सुरु झाल्यापासून अनेक Smartphones भारतीय बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, या आठवड्यात देखील अनेक प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता आपले नवे स्मार्टफोन्स भारतात लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. Realme, Motorola, Oneplus इ. स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. बघुयात यादी-

Motorola Edge 50 Ultra

Motorola Edge 50 Ultra फोन भारतात 18 जून रोजी लाँच होणार आहे. कंपनीने नुकतीच या फोनच्या लॉन्च डेटचे अनावरण केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Flipkart वरून खरेदी करता येईल. Flipkart च्या माध्यमातून फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. हा फोन 6.7 इंच लांबीचा 3D डिस्प्ले देण्यात येईल. चांगल्या परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी 50MP कॅमेरा सेटअप आणि पॉवरसाठी 125W TurboPower वायर्ड चार्जिंग मिळेल.

OnePlus Nord CE4 Lite

OnePlus ने नवीन स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म केली आहे. कंपनीने भारतात 18 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता नवीन फोन लाँच करण्याची घोषणा केली आहे.

Realme GT 6

कंपनीने अलिडकेच Realme GT 6T स्मार्टफोन भारतात लाँच केला. त्यानंतर आता कंपनी भारतात Realme GT 6 स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन भारतात 20 जून रोजी लाँच होण्यास सज्ज झाला आहे. हा फोनदेखील Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. कारण, फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह झाली आहे. हा फोन Snapdragon 8s gen 3 प्रोसेसर आणि अनेक AI फीचर्सने सुसज्ज असेल. पॉवरचा हा फोन 5500mAh बॅटरीसह येईल, ज्यासह 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल.

Realme GT 6

Infinix Note 40 5G

कंपनीने अलीकडेच Infinix Note 40 5G फोनची लाँच डेट जाहीर केली आहे. हा फोन भारतात 21 जून रोजी लाँच केला जाईल. लीकनुसार, हा फोन MediaTek Dimensity 7020 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी यात 108MP कॅमेरा दिला जाईल. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा असेल. हा फोन भारतातील Xiaomi, Realme आणि Oppo फोनशी स्पर्धा करेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :