#image_title
2024 चा एप्रिल महिना सुरु होऊन आता एक आठवडा उलटून गेला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात जबरदस्त Smartphones लाँच झाले. मागील आठवड्यात OnePlus Nord CE 4, Realme 12x 5G आणि Motorola Edge 50 Pro स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. तर, एप्रिलच्या या नव्या आठवड्यातही अनेक स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहेत. चला तर मग बघुयात या आठवड्यात लाँच होणाऱ्या फोनची यादी-
आगामी Samsung Galaxy M55 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची पुष्टी झाली आहे. हा फोन भारतात आज सोमवारी म्हणजेच 8 एप्रिलला लाँच केला जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Amazon India वर आधीच लाइव्ह करण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 प्रोसेसर, OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP सेल्फी कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट यांसारखी फीचर्स मिळतील, अशी शक्यता आहे.
वरील Samsung Galaxy M55 5G प्रमाणे Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोन देखील भारतात 8 एप्रिल रोजी लाँच केला जाणार आहे. वरील फोनप्रमाणे, या फोनची समर्पित मायक्रोसाइट देखील Amazon India वर लाइव्ह झाली आहे. फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा डिस्प्ले, MediaTek Dimensity 6100+ 6nm प्रोसेसर, OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा, 13MP सेल्फी कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट यांसारखे फीचर्स मिळतील, अशी अपेक्षा आहे.
Infinix 40 Pro 5G सिरीजची भारतीय लाँच डेट नुकतेच जाहीर करण्यात आली आहे. ही सिरीज भारतात 12 एप्रिलला लाँच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये दोन फोन Infinix Note 40 Pro आणि Pro+ 5G लाँच केले जाऊ शकतात. या फोनची मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह झाली आहे. सूचीनुसार, या फोनमध्ये 108MP प्राइमरी, 32MP सेल्फी कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. त्याबरोबरच, हा फोन ऑब्सिडियन ब्लॅक, टायटन गोल्ड आणि विंटेज ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये भारतात सादर केला जाईल.