Realme 14x 5G
Smartphones Launch This Week: 2024 वर्षीचा शेवटचा महिना डिसेंबरदेखील आता अर्ध्यात आला आहे वर्षाच्या अखेरच्या दिवसांमध्येही अनेक स्मार्टफोन कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन भारतात सादर करणार आहेत. होय, या आठवड्यात देखील अनेक स्मार्टफोन लाँच होणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या आठवड्यात Realme, POCO ब्रँड्सचे अनेक बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन भारतात लाँच होण्यासाठी सज्ज झाले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या आठवड्यात भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-
Also Read: Best Smartphoes Under 20000: 2024 मध्ये परवडणाऱ्या किमतीत लाँच झालेले टॉप 5 फोन्स, पहा यादी
आगामी POCO C75 5G स्मार्टफोन भारतात 17 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी असेल. ग्राहक हा फोन इ-कॉमर्स साईट Flipkart च्या माध्यमातून खरेदी करण्यास सक्षम असतील. लॉन्चपूर्वीच या फोनचे अनेक फीचर्स अधिकृत उघड झाले आहेत. परफॉर्मन्ससाठी, हा फोन Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोनचा डिस्प्ले 6.88 इंच लांबीचा HD डिस्प्ले असेल. तर, फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा मिळेल.
याच कंपनीचा दुसरा स्मार्टफोन POCO M7 Pro 5G देखील भारतात 17 डिसेंबर रोजी लाँच होईल. या फोनची विक्री देखील वरील फोनप्रमाणे Flipkart वर सुरु होईल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Mediatek Dimensity 7020 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असेल. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे.
Realme चा आगामी स्मार्टफोन Realme 14X 5G फोन भारतात 18 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. तर, वॉटर प्रोटेक्शनसाठी या फोनला IP69 रेटिंग देखील मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. या स्मार्टफोनची विक्रीदेखील Flipkart वर होईल. तर, फोनमध्ये ब्लॅक, क्रीम आणि रेड असे तीन कलर ऑप्शन्स आहेत.
देशी कंपनीचा आगामी स्मार्टफोन LAVA Blaze Duo फोन येत्या 16 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. हा फोन ड्युअल डिस्प्लेसह दाखल होईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनच्या मागील बाजूस 1.58 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Mediatek Dimensity 7020 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी हा फोन 64MP मेन कॅमेरासह उपलब्ध असेल.