Upcoming Smartphone November 2023: हे जबरदस्त फोन पुढील महिन्यात लाँच होण्यास सज्ज, संपूर्ण यादी पहा

Upcoming Smartphone November 2023: हे जबरदस्त फोन पुढील महिन्यात लाँच होण्यास सज्ज, संपूर्ण यादी पहा
HIGHLIGHTS

स्मार्टफोन लाँचच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना खूप जास्त एक्सायटिंग असणार आहे.

यामध्ये Lava, IQ, Vivo, Oppo, Realme, OnePlus आणि Samsung चे स्मार्टफोन समाविष्ट

Lava Blaze 2 हा फोन 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे.

बघता बघता 2023 वर्ष संपायला आता केवळ दोन महिने उरले आहेत. स्मार्टफोन लाँचच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना खूप जास्त एक्सायटिंग असणार आहे. या महिन्यात अनेक जबरदस्त बहुप्रतीक्षित Smartphone लाँच होणार आहेत. त्यामुळे टेक विश्वात सध्या या स्मार्टफोन्सच्या लाँचची तयारी सुरु आहे. यामध्ये Lava, IQ, Vivo, Oppo, Realme, OnePlus आणि Samsung चे स्मार्टफोन समाविष्ट आहेत. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर जरा थांबा कारण अवघ्या काही दिवसांत नवीन फोन मार्केटमध्ये येत आहेत. आगामी स्मार्टफोन्सची यादी आम्ही तुमच्यासाठी तयार केली आहे.

Lava Blaze 2

यादीमध्ये सर्वप्रथम देशी कंपनीच्या बजेट स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांअंतर्गत लाँच होण्याची अपेक्षा आहे. हा फोन 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. फोन बॉक्सी डिझाइन आणि गोलाकार कॅमेरा मॉड्यूलसह ​​येईल. यामध्ये MediaTek Dimension 6020 चिपसेट सपोर्ट दिला जाईल. हा फोन 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सह येईल, असे सांगितले जात आहे.

OnePlus 12

हा फोन देखील पुढील महिन्यात लाँच होईल, असे म्हटले जात आहे. लीकनुसार, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा BOE X1 OLED डिस्प्ले आहे. फोन 1Hz-120Hz LTPO रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये 50MP रुंद, 48MP अल्ट्रा वाइड आणि 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5400mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

iQOO 12 smartphone Series camera details
IQOO 12

IQOO 12

IQOO 12 च्या लाँचची टेक विश्वात गेल्या काही काळापासून चर्चा सुरु आहे. हा फोन चीनमध्ये 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता लाँच होईल. iQoo 12 सीरीज अंतर्गत, iQoo 12 आणि iQoo 12 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले जातील. फोनला नवीन डिझाइनसह अपडेटेड स्पेसिफिकेशन्स दिले जातील. फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट सपोर्ट सह येईल. फोनमध्ये दोन 50MP कॅमेरे दिले जातील, तर आणखी 64MP कॅमेरा सेन्सर दिला जाईल.

Vivo X100 Series

Vivo X100, Vivo X100 Pro आणि Vivo X100 Pro Plus स्मार्टफोन Vivo X100 सीरीज अंतर्गत लॉन्च केले जातील. ही सिरीज 17 नोव्हेंबर रोजी लाँच होण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये एक नवीन कॅमेरा लेन्स प्रदान केला जाईल, जो पेरिस्कोपिक झूम कॅमेरासह येईल. फोन Snapdragon 8 Gen 3 चिपसेट सपोर्टसह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo