Unique रिंग लाइट फिचरसह Lava Blaze 2 5G फोन भारतात होणार दाखल, लाँच डेट कन्फर्म। Tech News
Lava Blaze 2 5G स्मार्टफोनच्या भारतातील लाँच डेटची पुष्टी झाली आहे.
हा फोन भारतात 2 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल.
कॅमेरा मॉड्यूलमध्ये एक अनोखे 'रिंग लाइट' फिचर देण्यात आले आहे.
देशी कंपनी Lava चा नवा अफोर्डेबल फोन म्हणजेच परवडणाऱ्या किमतीत लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. Lava Blaze 2 5G स्मार्टफोनच्या भारतातील लाँच डेटची पुष्टी झाली आहे. हा फोन Lava Blaze 5G चा सक्सेसर असणार आहे. लीक झालेल्या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर कंपनी हा फोन 9 हजार रुपयांपासून ते 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत देऊ शकते. काही काळापूर्वी कंपनीने या फोनचे लाँच टीज केले होते. आता अखेर त्याची लाँच डेट जाहीर केली आहे.
Surveyहोय, लाँचपूर्वी, कंपनीने फोनसाठी एक डेडिकेटेड मायक्रोसाइट लाइव्ह केली आहे, ज्यामध्ये फोनचे डिझाइन आणि कलर ऑप्शन्स पाहिले जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात आगामी फोनशी संबंधित सर्व तपशील.
Lava Blaze 2 5G ची लाँच डेट
Lava Mobiles ने त्याच्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलवर Lava Blaze 2 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात 2 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. या पोस्टसोबत एक टीझर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
#Blaze25G is here to redefine the smartphone experience. Join us for the launch event on 2nd Nov, 12 PM on YouTube. Don't miss out on the unveiling event of #LordOf5G
— Lava Mobiles (@LavaMobile) October 25, 2023
Register for the Launch Event & Win*: https://t.co/2e9cu8oU7k
*T&C Apply #ProudlyIndian #LavaMobiles pic.twitter.com/CPxJZMF3n7
या व्हीडिओमध्ये फोनची पहिली झलक दिसत आहे, ज्यामध्ये फोनच्या डिझाइन आणि कलर ऑप्शन्सची माहिती देखील देण्यात आली आहे. यासोबतच फोनच्या डेडिकेटेड मायक्रोसाइटची लिंकही पोस्टमध्ये शेअर केली आहे.
Lava Blaze 2 5G चा टीजर
फोनच्या टीझर व्हिडिओमध्ये Lava Blaze 2 5G चे डिझाईन दिसले आहे. या फोनच्या मागील बाजूस एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. या कॅमेरा मॉड्यूलमध्ये एक अनोखी (युनिक) फीचर देण्यात आले आहे, ज्याला ‘रिंग लाइट’ असे नाव देण्यात आले आहे. हे फीचर नोटिफिकेशन LED म्हणून काम करेल, असे सांगण्यात येत आहे.
एवढेच नाही तर, फोनच्या उजव्या काठावर व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण देण्यात आले आहे, जे फिंगरप्रिंट सेन्सर म्हणूनही काम करेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 50MP कॅमेरा असेल ज्यामध्ये LED फ्लॅश लाईट दिली जाईल. या फोनमध्ये ब्लॅक, लाईट ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शन्स उपलब्ध असतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile