Upcoming Smartphones in February 2025
Upcoming Smartphones in February 2025: पाहता पाहता नवीन वर्षाचा म्हणजेच 2025 चा पहिला महिना संपत आलेला आहे. 2025 ची मोबाईल मार्केटसाठी मोठी शानदार सुरुवात झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, जानेवारी महिन्यात भारतात अनेक पॉवरफुल फ्लॅगशिप फोन लाँच झाले आहेत. लक्षात घ्या की, जानेवारी महिना परफॉर्मन्स बेस्ड स्मार्टफोन्सच्या नावावर झाला आहे. दरम्यान, आता फेब्रुवारी 2025 मध्येही अनेक उत्तम फोन टेक विश्वात दाखल होणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात पुढील महिन्यात लाँच होण्याची शक्यता असलेल्या स्मार्टफोन्सची यादी-
Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या Vivo Y58 5G मिळतोय भारी Discount, अगदी स्वस्त खरेदी करण्याची संधी
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ची ‘V’ स्मार्टफोन सिरीज प्रीमियम लूक आणि दर्जेदार कॅमेऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढे आलेल्या लीकनुसार, हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6,000mAh ची शक्तिशाली बॅटरी असू शकते. नवीनतम Vivo V50 मध्ये एक अद्भुत कॅमेरा देखील असेल, ज्यामध्ये कार्ल झीस लेन्स वापरला जाईल. तर, हा मोबाईल फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल, ज्यामध्ये 50MP OIS सेन्सर आणि 50MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स उपलब्ध असेल. त्याबरोबरच, फोनच्या समोर 50MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने iQOO Neo 10R फोन लाँच केला जाईल. लीकनुसार, या स्मार्टफोनमध्ये स्टायलिश डिझाइनसह उत्तम कॅमेरा देखील असेल. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8S Gen 3 प्रोसेसरसह आणला जाऊ शकतो. तसेच, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ताज्या अहवालानुसार, या सेटअपमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर दिला जाईल आणि यासाठी सोनी LYT-600 लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देखील उपलब्ध असेल. तसेच, या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट असण्याची अपेक्षा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6400mAh बॅटरी मिळेल.
Realme P3 Pro हा देखील एक मध्यम बजेटचा मोबाइल असेल. Realme P3 Pro 5G फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसरवर आणला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी मिळू शकते. जर लीक्सवर विश्वास ठेवायचा असेल तर, Realme P3 Pro फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल. ज्यामध्ये मुख्य 50MP OIS सेन्सर असू शकतो. यासोबतच, फोनमध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, हा Realme फोन 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. हा फोन 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल.
Samsung ने Galaxy S25 सिरीज सादर केल्यानंतर कंपनीचे पुढील लक्ष्य आता Samsung Galaxy A56 फोन आहे, असे दिसत आहे. हा फोन देखील फेब्रुवारीमध्ये लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे. सध्या लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही. पण हा फोन या महिन्यात Exynos 1580 प्रोसेसर, 12GB रॅम आणि AMOLED डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर, 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5MP चा मॅक्रो सेन्सर अपेक्षित आहे. तर, फोनच्या पुढील भागात 12MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.