आगामी Samsung Galaxy M56 5G भारतात दमदार फीचर्ससह ‘या’ दिवशी होणार लाँच, जाणून घ्या किंमत

Updated on 11-Apr-2025
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M56 5G या महिन्यात भारतीय बाजारात होणार लाँच

Samsung Galaxy M56 5G फोन 17 एप्रिल 2025 रोजी लाँच होणार

Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोनची किंमत मध्यम श्रेणीअंतर्गत असू शकते.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने मागील वर्षी Samsung Galaxy M55 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. आता या डिव्हाइसचा उत्तराधिकारी Samsung Galaxy M56 5G या महिन्यात भारतीय बाजारात लाँच केला जाईल. या हँडसेटची लाँचिंग तारीख जाहीर करण्यात आली आहे. या M-सिरीज स्मार्टफोनमध्ये मोठ्या स्क्रीनपासून ते पॉवरफुल बॅटरीसह सर्व काही असेल. आगामी Samsung Galaxy M56 5G फोन Xiaomi, Oppo आणि Realme सारख्या ब्रँडच्या फोन्सना जबरदस्त स्पर्धा देणार आहे.

Also Read: Price Drop! जबरदस्त Samsung Galaxy F55 5G च्या किमतीत घसरण, तब्बल 10,000 रुपयांची सूट

Samsung Galaxy M56 5G चे भारतीय लॉन्चिंग

Samsung ने आपल्या अधिकृत X हँडलवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, Samsung Galaxy M56 5G फोन 17 एप्रिल 2025 रोजी लाँच होणार आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वरून केली जाईल. या स्मार्टफोनची किंमत मध्यम श्रेणी अंतर्गत असण्याची शक्यता आहे. मात्र, फोनच्या खरी किंमत फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.

Samsung Galaxy M56 5G चे कन्फर्म स्पेक्स

Samsung ने फोनचे काही फीचर्स देखील कन्फर्म केले आहेत. कंपनीने सांगितले की, Samsung Galaxy M56 ची जाडी 7.2mm असेल. हा फोन Samsung Galaxy M55 पेक्षा 30% स्लिम असेल. या स्मार्टफोनचे वजन 180 ग्रॅम असेल. डिस्प्ले आणि बॅक-पॅनलच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ देखील स्थापित केले जाईल.

एवढेच नाही तर, उत्तम फोटोग्राफीसाठी आगामी स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS ला सपोर्ट करणारा 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो सेन्सर असेल. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये समोर 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याद्वारे HDR व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

याव्यतिरिक्त, लीकनुसार स्मार्टफोनमध्ये Exynos चिपसेट दिली जाऊ शकते. पॉवर बॅकअपसाठी या हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच, यात 8GB रॅम आणि सुपर AMOLED+ डिस्प्ले असेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :