Realme GT 7 launch
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Realme च्या आगामी Realme GT 7 फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनची मायक्रो-साइट शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर लाईव्ह करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे उपकरण आणण्यासाठी BGMI ने क्राफ्टन निर्माता कंपनीसोबत भागीदारी केली, असे उघड झाले आहे. जाणून घेऊयात सविस्तर तपशील-
Also Read: Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार cmf, Motorola चे जबरदस्त फोन्स!
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon लिस्टिंगनुसार Realme GT 7 स्मार्टफोन 6 तासांपर्यंत 120FPS वर कार्य करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यामुळे गेमर्सना एक चांगला गेमिंग अनुभव मिळणार आहे. एवढेच नाही तर, या फोनशी संबंधित कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. महत्त्वाचे लक्षात घ्या की, कंपनीने गेल्या आठवड्यात चीनमध्ये GT 7 फोन सादर केला होता. अशा परिस्थितीत, भारतात येणाऱ्या फोनमध्ये चिनी व्हेरिएंटसारखे समान फीचर्स असतील, असा अंदाज लावला जात आहे.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, Realme ने अद्याप त्यांच्या आगामी स्मार्टफोन Realme GT 7 च्या किमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लीकमध्ये असे म्हटले जात आहे की, या फोनची सुरुवातीची किंमत 30 ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. मात्र, फोनची खरी किंमत लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.
Realme GT 7 या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. सुरळीत काम करण्यासाठी, स्पीड आणि मल्टटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9400+ चिप मिळू शकते. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळते. हा फोन नवीनतम Android 15 आधारित Realme UI 6.0 वर कार्य करतो. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल सिम स्लॉट, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. त्याला IP69 रेटिंग देखील मिळाले आहे.
फोटोग्राफीसाठी, नवीन स्मार्टफोनमध्ये 50MP सोनी IMX896 लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर मिळणार आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटला 16MP कॅमेरा मिळेल. या फोनच्या कॅमेऱ्याद्वारे यात 4K व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. कंपनीने Realme GT 7 मध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 7,200mAh बॅटरी दिली आहे. यात IR ब्लास्टर, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे. मात्र, लक्षात घ्या की, फोनचे सर्व कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.