upcoming Nothing Phone 3 to launch in March 2025
आपल्या अनोख्या ट्रान्सपरंट डिझाईनसह स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध कंपनी Nothing लवकरच बाजारात नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन Nothing Phone 3 असेल, असे मानले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आगामी फोनची टीजिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरु झाली आहे. यासह कंपनीने काही स्केचेस सादर केले आहेत, ज्यामध्ये फोनची एक झलक दिसत आहे. लक्षात घ्या की, स्मार्टफोनचे लाँच, किंमत आणि इतर तपशीलांबद्दल अद्याप अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
Also Read: Google Pixel 8 वर गोल्डन ऑफर उपलब्ध! महागड्या स्मार्टफोन्सवर मिळतोय थेट 26,000 रुपयांचा Discount
Nothing ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये हातांनी तयार केलेली काही स्केचेस दिसत आहेत. हे स्केचेस सूचित करतात की, डिव्हाइसमध्ये ट्रान्सपरंट बॅक पॅन दिले जाईल. तर, इतर इमेजेसमध्ये दोन सर्कल्स दिली आहेत. ज्यामध्ये Pill-शेप कॅमेरा सेटअप आगामी फोनमध्ये उपलब्ध असेल, असे समजते. आम्ही तुम्हाला सांगतो की, समान कॅमेरा सेटअप सध्या Nothing Phone 2 मध्ये उपलब्ध आहे
लीकनुसार, प्रसिद्ध टीपस्टर Evan Blass ने एक पत्र जारी केले होते, ज्यामध्ये Carl Pei ने सांगितले की, नवीन फोन 2025 च्या पहिल्या तिमाहीत लाँच केला जाणार आहे. ही माहिती योग्य असल्यास डिव्हाइस मार्चमध्ये टेक विश्वात दाखल होईल. हे प्रीमियम श्रेणीतील Samsung, Xiaomi, Realme आणि OPPO सारख्या ब्रँडच्या मोबाइल फोनशी स्पर्धा करेल.
त्याबरोबरच, ताज्या लीक रिपोर्ट्सनुसार, या फोनमध्ये AI फीचर्ससह एक AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्यामध्ये 120Hz चा रीफ्रेश रेट असेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Nothing Phone 3 मध्ये अंतर्गत स्टोरेज 512GB पर्यंत दिले जाण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, हँडसेटला 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा मिळू शकतो. आगामी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमची स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिप दिली जाईल. मात्र, फोनबद्दल सर्व कन्फर्म माहिती फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.