Vivo x200 series
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच Vivo V50 भारतात लाँच केला आहे. त्यानंतर, कंपनीने आगामी Vivo X200 Ultra आणि X200S च्या लाँचची घोषणा केली आहे. गेल्या काही काळापासून विवोच्या आगामी स्मटफोनची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. Vivo X200 सिरीजअंतर्गत, Vivo X200 5G आणि Vivo X200 Pro 5G हे दोन स्मार्टफोन आधीच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
त्यानंतर, आता कंपनी या सिरीजमध्ये आणखी दोन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. लक्षात घ्या की, कंपनीने अद्याप स्मार्टफोनच्या लाँचिंग तारखेची घोषणा केलेली नाही. मात्र, ताज्या लीक झालेल्या अहवालात फोनच्या लाँचिंग टाइमलाइनचा खुलासा करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर तपशील-
Also Read: ऑफर चुकवू नका! लोकप्रिय Vivo V40e 5G वर धमाकेदार Discount, मिळवा तब्बल 9000 रुपयांची सूट
ताज्या लीक रिपोर्टनुसार, Vivo चे आगामी स्मार्टफोन्स Vivo X200 Ultra आणि Vivo X200S स्मार्टफोन या वर्षी येत्या एप्रिलमध्ये लाँच केले जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फोन एप्रिलच्या मध्यात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबरोबरच, लीक झालेल्या अहवालात या स्मार्टफोनच्या खास फीचर्सचा उल्लेख करण्यात आला आहे.
लीकनुसार, स्मार्टफोनमध्ये 35 मिमीचा मुख्य कॅमेरा आणि अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर मिळू शकतो. त्याबरोबरच, Vivo X200 आणि Vivo X200 Pro 5G स्मार्टफोन ऑक्टोबर 2024 मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की Vivo X200 Ultra स्मार्टफोनमध्ये नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर मिळू शकतो. या चिपसेटसह येणारा डिव्हाइस या सिरीजमधील पहिला हँडसेट असेल. लक्षात घ्या की, X200 आणि X200 Pro स्मार्टफोन्स डायमेन्सिटी 9400 चिपसेटद्वारे समर्थित आहेत.
याव्यतिरिक्त, पुढील Vivo X200S बद्दल बोलायचे झाल्यास, या Vivo फोनमध्ये नवीन Dimensity 9400 Plus चिपसेट मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनी एप्रिलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात Vivo X200 Pro Mini चा एक नवीन कलर व्हेरिएंट लाँच करण्याची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा आहे की कंपनी लवकरच स्मार्टफोनच्या लाँचिंग तारखेबद्दल आणि फीचर्सबद्दल तपशील शेअर करू शकते. मात्र, फोनची किंमत आणि सर्व योग्य तपशील फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.