Upcoming Mobile Phone This Week
Upcoming Mobile Phones This Week: फेब्रुवारी 2025 च्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय बाजारात अनेक अप्रतिम स्मार्टफोन लाँच होणार आहेत. जर तुम्ही देखील स्वतःसाठी नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे. कारण, या आठवड्यात भारतात Vivo आणि Realme चे पॉवरफुल स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. तुम्ही हे स्मार्टफोन Flipkart आणि Amazon वरून खरेदी करण्यास सक्षम असाल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे सर्व स्मार्टफोन जंबो बॅटरीसह येतील, जे एकदा चार्ज केल्यावर युजर अधिक काळ वापरण्यास सक्षम असतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात या आठवड्यात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-
Also Read: 50MP कॅमेरासह आकर्षक Vivo Y58 5G वर भारी Discount, किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी
Vivo चा आगामी स्मार्टफोन Vivo V50 ची चर्चा गेल्या अधिक काळापासून सुरु आहे. अखेर आज 17 फेब्रुवारी रोजी हा फोन भारतीय बाजारात लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी हा फोन 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करू शकते. हा फोन Flipkart आणि Amazon या दोन्ही ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये अल्ट्रा स्लिम कर्व्हड डिस्प्ले असेल. याशिवाय, फोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी दिली जाईल, ज्यामध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. फोटोग्राफीसाठी 50MP चा झीस कॅमेरा असेल. पाण्याच्या संरक्षणासाठी IP69 आणि IP69 रेटिंग उपलब्ध असतील. हा फोन रेड, ब्लु आणि ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल.
Realme चा आगामी स्मार्टफोन Realme P3 Pro 5G फोन उद्या 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Flipkart वरून खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनमध्ये अंधारात चमकणारी म्हणजेच ग्लो इन द डार्क अशी अनोखी डिझाईन आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसर असेल. त्याला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग असतील. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी देखील असेल. फोन लाँच झाल्यानंतर फोनचे किंमत आणि तपशील पुढे येतील.
Realme P3X 5G फोन देखील Realme P3 Pro 5G सह उद्या 18 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री देखील इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसरने सुसज्ज असेल. तसेच, पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी देखील 6000mAh असेल, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. पाण्याच्या प्रतिकारासाठी, या फोनमध्ये IP68+ IP69 रेटिंग असणार आहे. फोनची किंमत आणि इतर तपशील या Realme P3X 5G लाँच झाल्यावर पुढे येतील.
iPhone SE 4 फोन 19 फेब्रुवारी रोजी जागतिक आणि भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone SE 4 चा लूक आणि डिझाइन iPhone 16 पेक्षा निश्चितच वेगळा असेल. मात्र, कामगिरीच्या बाबतीत दोन्ही फोन सारखेच असू शकतात, असे बोलले जात आहे. या फोनमध्ये Bionic A18 प्रोसेसर उपलब्ध असू शकतो. हा iPhone बाजारात 8GB रॅम मेमरीसह लाँच केला जाऊ शकतो.