iQOO चा 6000mAh बॅटरीसह भारतातील ‘सर्वात स्लिम स्मार्टफोन’ लवकरच होणार लाँच, ‘या’ दिवशी होणार दाखल
नवीनतम iQOO Z9x 5G हँडसेट 16 मे रोजी भारतात लाँच होणार
iQOO Z9x मॉडेल 6000mAh बॅटरीसह येणारा भारतातील सर्वात पातळ फोन असेल.
कंपनीच्या X हँडल आणि Amazon microsite द्वारे या स्मार्टफोनच्या फीचर्सची पुष्टी
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO लवकरच नवीनतम iQOO Z9x 5G हँडसेट 16 मे रोजी भारतात लाँच करणार आहे. कंपनीने अलीकडेच आगामी iQOO Z9x 5G च्या प्रोसेसर आणि बॅटरीच्या डिटेल्सची पुष्टी केली आहे. खरं तर, कंपनीच्या X हँडल आणि Amazon microsite द्वारे या स्मार्टफोनच्या फीचर्सची पुष्टी झाली आहे. आता, iQOO ने iQOO Z9x 5G चे आणखी फीचर्स उघड केले आहे. त्याबरोबरच, कंपनीने अलीकडेच फोनची भारतीय लाँच डेट देखील उघड केली आहे.
Surveyहे सुद्धा वाचा: Smartphone Tips: तुमच्या iPhone ची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी अगदी Important टिप्स, कंपनीने दिली माहिती। Tech News
Say goodbye to battery anxiety and hello to endless possibilities!💪🔋 With slimmest in the segment* 6000mAh on #iQOOZ9x, you can stay #FullDayFullyLoaded and go beyond limits. Loading on 16th May @amazonIN
— iQOO India (@IqooInd) May 10, 2024
Know more: https://t.co/58Yr6ODi7T#iQOO #iQOOZ9x #FullDayFullyLoaded pic.twitter.com/umGhM7TLNx
iQOO Z9x 5G च्या पुढील फीचर्सची पुष्टी
iQOO च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.72-इंच लांबीचा डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. डिव्हाइसला सेगमेंटमध्ये सर्वात ब्राईट डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, हा फोन 50MP मुख्य कॅमेरासह येऊ शकतो. याव्यतिरिक्त, कंपनीने आधीच पुष्टी केली होती की, हा डिवाइस 6000mAh बॅटरीने सुसज्ज असेल, जो 44W चार्जिंगला सपोर्ट करेल. iQOO Z9x मॉडेल 6000mAh बॅटरीसह येणारा भारतातील सर्वात पातळ फोन असेल, असे कंपनीने सांगितले.
आगामी फोनच्या इतर फीचर्समध्ये IP64 रेटिंग, 3.5mm इअरफोन पोर्ट, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, Android 14 इ, मिळतील. याशिवाय, कंपनी या फोनसाठी 2 वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट आणि 3 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्सचे वचन देखील देत आहे. याशिवाय, हा हँडसेट स्टॉर्म ग्रे आणि टॉर्नेडो ग्रीन या दोन कलर ऑप्शन्ससह येण्याची शक्यता आहे.

iQOO Z9x 5G चे अपेक्षित स्पेक्स
iQOO Z9x 5G आधीच चीनच्या बाजरात लाँच करण्यात आला आहे. भारतीय iQOO Z9x च्या इमेजेसद्वारे समजते की, अलीकडेच चीनमध्ये लाँच झालेल्या Z9x सारखे असू शकतात. फोनचे स्पेक्स देखील चिनी व्हेरिएंटच्या समान असतील, असे म्हटले जात आहे. iQOO Z9x चा चीनी व्हेरिएंट 8MP फ्रंट कॅमेरासह येतो. मात्र, फोनचे सर्व कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील, असे म्हटले जात आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile