Smartphone Tips: तुमच्या iPhone ची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी अगदी Important टिप्स, कंपनीने दिली माहिती। Tech News 

Smartphone Tips: तुमच्या iPhone ची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी अगदी Important टिप्स, कंपनीने दिली माहिती। Tech News 
HIGHLIGHTS

नेहमीच iPhone युजर्सना फोनच्या बॅटरी लाईफच्या तक्रारी असतात.

iPhone ची बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

Apple ने त्यांचे डिवाइस म्हणेजच iPhone 16°-22°C दरम्यान वापरण्यासाठी डिझाइन केला आहे.

तुमच्या जवळच्या लोकांकडे किंवा तुमच्या मित्रमंडळींकडे जर iPhone असेल तर ते नेहमीच त्यांच्या फोनच्या बॅटरी लाईफबद्दल तक्रार करत असतात. आपण बघतच आहोत की, दर वर्षी लाँच होणाऱ्या लेटेस्ट iPhone सह किमती देखील वाढत असतात, मात्र बॅटरी लाईफच्या तक्रारी काही कमी होत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आता Apple ने स्वतः फोनची बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात हे महत्त्वाचे टिप्स-

हे सुद्धा वाचा: How to: उन्हाळ्यात तुमचा Smartphone गरम होण्याची देखील समस्या आहे का? बघा 5 सोप्या टिप्स। Tech News

iphone

iPhone अपडेट ठेवा.

जर तुमचा iPhone तुम्ही वेळच्या वेळी अपडेट करत असाल तर, त्याची बॅटरी लाइफ कमी होण्याची शक्यता खूप कमी होते. लक्षात घ्या की, नवे अपडेट्स काही नवीन फीचर्स तर आणतातच, पण बॅटरी देखील ऑप्टिमाइझ केली जाते. एवढेच नाही तर, अपडेटसह अनेक बग देखील फिक्स केले जातात.

वापर न झाल्यास बॅटरी फुल चार्ज करू नका.

जर तुम्हाला तुमचा iPhone बराच काळ वापरायचा नसेल, तर बॅटरी फुल चार्ज अजिबात करू नका. वापरात राहणार नसल्यास फोनची बॅटरी कमीतकमी 50% पर्यंत चार्ज ठेवा. iPhone फुल चार्ज्ड किंवा फुल डिस्चार्ज करून ठेवणे, असे करणे योग्य नाही. तुम्हाला फोन वापरायचा नसेल तर फोन रूम टेम्परेचरमध्ये असू द्या.

फोनचे टेम्परेचर मेंटेन ठेवा.

Apple ने त्यांचे डिवाइस म्हणेजच iPhone 16°-22°C दरम्यान वापरण्यासाठी डिझाइन केला आहे. तापमान 35°C पेक्षा जास्त असल्यास, बॅटरी लाईफवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये काहीवेळा iPhone चार्ज करण्यास नकार देईल, तर तीव्र थंडीत वापर झाल्याने बॅटरी लाईफ कमी होईल.

iphones battery tips

काही वेळा आपण बघतो की, अनेक युजर्स फोन खूप गरम असताना फ्रीझमध्ये ठेवण्याची चूक करतात. तर, अशाप्रकारची चूक अजिबात करू नका. जर तापमान iPhone योग्य नसेल तर, फोन बंद करून ठेवणेच चांगले राहील.

लो पॉवर मोड ऑन करा.

Apple ने iOS 9 सह लो पॉवर मोड सादर केला. हे फिचर बॅटरी लाईफ सुधारणे आणि ऑप्टिमाइझ करण्यासाठी तयार केलेले आहे. हे फिचर ऑन केल्यानंतर बॅकग्राउंडमध्ये ॲप रिफ्रेश होणे थांबते.

चार्जिंग करताना कव्हर काढून घ्या.

अनेक iPhone कव्हर आहेत, जे चार्जिंग करताना उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत. यामुळे फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. चार्जिंग दरम्यान फोन जास्त गरम होत आहे असे वाटत असेल, तर कव्हर काढून चार्ज करा. यासह तुमच्या फोनचे बॅटरी लाईफ उत्तम राहील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo