iQOO Z10 Turbo सिरीजबद्दल महत्त्वाची माहिती उघड, मिळतील जबरदस्त फीचर्स

Updated on 23-Apr-2025
HIGHLIGHTS

अलीकडेच कंपनीने iQOO Z10 सिरीज लाँच केली.

आता आगामी iQOO Z10 टर्बो सिरीजच्या लाँचची घोषणा झाली आहे.

iQOO Z10 Turbo Pro फोन 7000mAh बॅटरीसह लाँच केला जाईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. कारण, अलीकडेच कंपनीने iQOO Z10 सिरीज लाँच केली आहे. त्यानंतर, आता आगामी iQOO Z10 टर्बो सिरीजच्या लाँचची घोषणा केली आहे. या स्मार्टफोन लाइनअपची लाँच तारीख जाहीर करण्यात आली आहे. या सिरीजअंतर्गत, iQOO Z10 Turbo आणि iQOO Z10 Turbo Pro फोन लाँच केले जातील. या हँडसेटमध्ये मोठ्या बॅटरीपासून ते एचडी डिस्प्ले आणि पॉवरफुल चिपपर्यंत सर्व काही असेल. जाणून घेऊयात iQOO Z10 Turbo सिरीजचे तपशील-

Also Read: तब्बल 4000 रुपयांच्या Discount सह खरेदी करा Realme P सिरीज फोन, रंग बदलणारा आकर्षक स्मार्टफोन

iQOO Z10 Turbo सिरीजचे लाँच टाइमलाईन

कंपनीच्या म्हणण्यानुसार, iQOO Z10 टर्बो लाइनअप 28 एप्रिल रोजी चीनमध्ये लाँच केली जाणार आहे. या सिरीजमधील स्मार्टफोन ऑरेंज, व्हाईट, गोल्डन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील. त्यांच्या आगमनामुळे जागतिक बाजारपेठेत Xiaomi, Motorola आणि Samsung सारख्या कंपन्यांना जोरदार स्पर्धा मिळणार आहे.

Z10 टर्बोच्या आधी, कंपनीने भारतीय बाजारात iQOO Z10 लाँच केले होते. या फोनची किंमत 21,999 रुपयांपासून सुरू होते. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Amazon India वरून खरेदी करता येईल.

iQOO Z10 Turbo सिरीजचे अपेक्षित तपशील

जर अलीकडील मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, iQOO Z10 Turbo मध्ये 6.78-इंच लांबीचा OLED LTPS डिस्प्ले असू शकतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz असेल आणि रिझोल्यूशन 1.5K असेल. सुरळीत कामकाजासाठी, फोनचे बेस स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसरने सुसज्ज असेल, तर प्रो मॉडेलमध्ये डायमेन्सिटी 8400 चिप मिळणार आहे.

फोटोग्राफीसाठी या दोन्ही मोबाईलमध्ये 50MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. मात्र, या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याशी संबंधित कोणतीही माहिती मिळालेली नाही. कंपनीने सांगितले की, iQOO Z10 Turbo Pro फोन 7000mAh बॅटरीसह लाँच केला जाईल. यासह, 120W फास्ट चार्जिंग उपलब्ध होईल. या फंक्शनसह, डिव्हाइसची बॅटरी 15 मिनिटांत 50% आणि 33 मिनिटांत 100% चार्ज होईल. त्याबरोबरच, iQOO Z10 टर्बो फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 7600mAh बॅटरी असेल. मात्र, फोनचे सर्व कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :