Reveal! आगामी iQOO Neo 10R लवकरच भारतात Powerful प्रोसेसरसह होणार लाँच, पहा सर्व डिटेल्स 

HIGHLIGHTS

iQOO ने अलीकडेच भारतात आपला iQOO Neo 10R लाँच करण्याची घोषणा

आगामी iQOO Neo 10R फोन 'Coming Soon' टॅग लाइनसह टीज केले गेले आहे.

नवीनतम स्मार्टफोन iQOO Neo 10R चा प्रोसेसर उघड झाला आहे.

Reveal! आगामी iQOO Neo 10R लवकरच भारतात Powerful प्रोसेसरसह होणार लाँच, पहा सर्व डिटेल्स 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने अलीकडेच भारतात आपला iQOO Neo 10R लाँच करण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर, या स्मार्टफोनची मायक्रो साइट देखील Amazon India या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर लाइव्ह झाली आहे. या मायक्रो साईटद्वारे हँडसेटमध्ये सापडलेला प्रोसेसर देखील समोर आला आहे. याआधी, आगामी फोनशी संबंधित अनेक रिपोर्ट्स आणि लीक्स समोर आले होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात iQOO Neo 10R फोनचे संपूर्ण इतर तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Best Offer! लेटेस्ट सिरीजच्या लाँचनंतर Samsung Galaxy S24 Ultra 5G च्या किमतीत कपात, पहा डील

iQOO Neo 10R ची Amazon लिस्टिंग

Amazon लिस्टिंगकडे हे दर्शविते की, आगामी iQOO Neo 10R फोन ‘Coming Soon’ टॅग लाइनसह टीज केले गेले आहे. असा अंदाज लावला जात आहे की, स्मार्टफोन येत्या फेब्रुवारीच्या सुरूवातीस लाँच केला जाऊ शकतो. iQOO Neo 10R फोनची प्रारंभिक किंमत 30 ते 35 हजारांच्या दरम्यान असेल. मात्र, फोनच्या वास्तविक लाँचशी संबंधित कोणतीही माहिती अधिकृतपणे पुढे आली नाही.

iQOO Neo सीरिजमध्ये सामील होणारा नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10R चा प्रोसेसर उघड झाला आहे. या डिवाइसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर दिला जाईल. या स्मार्टफोनचे बॅक-पॅनेल गेल्या वर्षी चीनमध्ये लाँच केलेल्या iQOO Neo 10 पासून डिझाइन केलेले आहे. याव्यतिरिक्त, डिव्हाइसशी संबंधित कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

iQOO Neo 10R

iQOO Neo 10R 5G
iQOO Neo 10R 5G

पुढे आलेल्या लीकनुसार, iQOO Neo 10R फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, ज्यामध्ये 144Hz चा रीफ्रेश दर असेल. तसेच, हा स्मार्टफोन Android 15 आधारित फनटच ओएस 15 वर कार्य करेल. फोटोग्राफीसाठी, iQOO चा नवीन स्मार्टफोन Neo 10R ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर असेल, जो OIS ने सुसज्ज असेल. त्याला 8MP अल्ट्रा वाइड एंगल लेन्स दिले जाईल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, तासन्तास काम करण्यासाठी या हँडसेटमध्ये 6,400mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo