Infinix Smart 9 HD
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix च्या आगामी स्मार्टफोन Infinix Smart 9 HD च्या भारतीय लाँचची घोषणा झाली आहे. या स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट देखील जाहीर झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात Infinix Smart 8 HD ची अपग्रेडेड आवृत्ती म्हणून भारतात सादर केला जाणार आहे. हा स्मार्टफोन अतिशय मजबूत बॉडीसह लाँच केला जाईल. हे बजेट श्रेणीतील Xiaomi, Lava आणि Techno सारख्या ब्रँडच्या फोनशी स्पर्धा करेल. याबद्दल अनेक लीकदेखील पुढे आले आहेत. जाणून घेऊयात Infinix Smart 9 HD चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: लेटेस्ट Realme 14 Pro सीरीजची पहिली सेल आजपासून सुरू, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
भारतातील प्रसिद्ध शॉपिंग वेबसाइट Flipkart वरील सक्रिय मायक्रो-साइटनुसार, Infinix Smart 9 HD स्मार्टफोन 28 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. या फोनला ‘Swag Se Solid’ या टॅगलाइननेही टीज करण्यात आले आहे. केवळ लाँच डेटच नाही तर, या फोनचे इतर तपशील देखील पुढे आले आहेत.
स्मार्टफोन ब्रँड Infinix ने अद्याप Smart 9 HD च्या फीचर्सबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. फोटो क्लिक करण्यासाठी, यात 6.6 इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले असेल, जाचा रीफ्रेश रेट 90Hz असेल. त्याबरोबरच, जलद काम करण्यासाठी, डिव्हाइसला Unisoc T606 चिपसेट, 64GB स्टोरेज आणि 4GB पर्यंत RAM मिळण्याची शक्यता आहे. मात्र, लक्षात घ्या की, Infinix Smart 9 HD स्मार्टफोनमध्ये मिळणारे सर्व स्पेक्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.
फोटोग्राफीसाठी, या हँडसेटला 13MP रियर आणि 8MP सेल्फी कॅमेरा प्रदान केला जाणार आहे. ऑनलाईन पुढे आलेल्या, लीक्स आणि रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हा स्मार्टफोन DTS ऑडिओला सपोर्ट करणाऱ्या डुअल स्पीकरसह येईल. Infinix च्या या आगामी मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये मिळणाऱ्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झल्यास, कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत फोनमध्ये ड्युअल सिम, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देखील दिले जातील.