CMF by Nothing Phone 1 Price
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing चा सब ब्रँड CMF ने मागील वर्षी आपला पहिला-वहिला CMF Phone 1 भारतात लाँच केला होता. त्यानंतर, आता कंपनी आपला आगामी नवीनतम स्मार्टफोन CMF Phone 2 लाँच करण्यास सज्ज झाली आहे. होय, कंपनी दुसरा फोन CMF Phone 2 नावाने लाँच करू शकते. सोशल मीडियावर जिकडे तिकडे आगामी फोनच्या लाँचची चर्चा सुरु आहे. एवढेच नाही तर, या फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाईट देखील Flipkart वर लाईव्ह करण्यात आली आहे. फोनचे स्पेक्स देखील लीक होत आहेत.
Also Read: ऐकावं ते नवलच! म्हणे सूर्यप्रकाशाने चार्ज होणारी Smartwatch भारतात लाँच, किंमत तर…
वर सांगितल्याप्रमाणे, आगामी CMF Phone 2 ची मायक्रोसाईट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. कंपनी या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये हा फोन लाँच करू शकते. टिझरद्वारे हा फोन आधीसारख्या नारंगी रंगात सादर केला जाऊ शकतो, हे पुढे आले आहे. मायक्रोसाईटद्वारे असा अंदाज लावला जात आहे की, हा कंपनीचा कॅमेरा फोकस फोन होऊ शकतो. कारण, आगामी फोनसाठी कंपनीने “in search of the perfect shot” अशी टॅगलाईन दिली आहे.
मात्र, आगामी फोन पहिल्या CMF Phone 1 पेक्षा किती वेगळा असेल? याचा अंदाज आगामी CMF Phone 2 फोनच्या लीक स्पेसिफिकेशन्सद्वारे लावला जाऊ शकतो.
लीकनुसार, आगामी फोन म्हणजेच CMF Phone 2 मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल.
तर, दुसरीकडे CMF Phone 1 मध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले रिझोल्यूशन 1080x 2400 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेटचे समर्थन आहे.
CMF Phone 1 फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर असू शकतो. तर, दुसरीकडे उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, आगामी फोनदेखील फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असू शकतो.
लीकनुसार, आगामी फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. यासोबतच, फोनमध्ये 8MP सेकेंडरी आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
CMF Phone 1 मध्ये कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 2MP चा कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल.
CMF Phone 1 च्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर, दुसरीकडे आगामी CMF फोनमध्ये देखील 5000mAh बॅटरी असेल, ज्यासोबत 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.