CMF Phone 2 Pro design teased
बाजारातील नवी स्मार्टफोन निर्माता CMF लवकरच आपला नवा फोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी CMF Phone 2 Pro या महिन्यात भारतात लाँच होणार आहे. हा CMF Phone 1 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. या फोनबद्दल अनेक लीक्स पुढे येत आहेत. आता हा आगामी फोन गीकबेंचवर पुढे आला आहे, ज्याद्वारे फोनच्या अनेक फीचर्सबद्दल माहिती मिळाली आहे. त्याबरोबरच, लीकमध्ये आगामी फोनची किंमत देखील पुढे आली आहे.
Also Read: WhatsApp Update: अरे व्वा! स्टेटसवर आता तब्बल 90 सेकंदाचा व्हिडिओ करा शेअर, नवे फिचर उपलब्ध
CMF Phone 2 Pro हा स्मार्टफोन येत्या 28 एप्रिल रोजी लाँच केला जाणार आहे, परंतु फोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, लीकमध्ये असे म्हटले जात आहे की, डिव्हाइसची किंमत 21,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. हा फोन ग्राहकांना अनेक कलर ऑप्शन्समध्ये मिळेल. लीकनुसार, या हँडसेटला IP52 रेटिंग मिळेल. तसेच, हा फोन व्हॉइस कंट्रोल आणि चॅटजीपीटीला सपोर्ट करेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, CMF Phone 2 Pro गीकबेंचवर दिसला आहे. या स्मार्टफोनमध्ये, अँड्रॉइड 15 वर कार्य करणारी नथिंग OS ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध असेल. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरील डेडिकेटेड मायक्रो-साइटनुसार, CMF फोन 2 प्रो सर्वात स्लिम आणि हलका असेल. चांगल्या कामगिरीसाठी, स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रो प्रोसेसर असेल.
आतापर्यंत रिलीज झालेल्या टीझरवरून हे स्पष्ट होते की, CMF फोन 2 प्रो ला मेटॅलिक फिनिश देण्यात आला आहे. फोनच्या मागील पॅनलवर कंपनीची ब्रँडिंग आहे. सध्याच्या हँडसेटप्रमाणे यातही काढता येण्याजोगा मागील पॅनेल असेल. एवढेच नाही तर, डिव्हाइसमध्ये तीन कॅमेरे देखील दिले जातील. याशिवाय, फोनशी संबंधित कोणतीही माहिती मिळालेली नाही. फोनबद्दल सर्व कन्फर्म माहिती लाँचनंतरच पुढे येईल.