CMF Phone 2 Pro launching with good looking design and features
नवी आणि प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता CMF चा नवा CMF Phone 2 Pro येत्या 28 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा नवीन मोबाईल भारतात आणि जागतिक स्तरावर नवीन ऑडिओ उत्पादनांसह लाँच केला जाईल. CMF फोन 2 प्रो लाँच करण्यासोबतच, CMF बड्स 2, बड्स 2a आणि बड्स 2 प्लस देखील 28 एप्रिल रोजी लाँच केले जात आहेत. ग्राहक हा हँडसेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart द्वारे खरेदी करू शकतील.
कंपनी सतत फोनच्या हार्डवेअर डिटेल्स आणि फीचर्सची माहिती देत आहे. यापूर्वी, चिपसेट, ट्रिपल कॅमेरा आणि डिझाइनची पुष्टी झाली आहे. आता लाँच होण्यापूर्वी भारतातील CMF फोन 2 प्रो ची किंमत लीक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात तपशील-
Also Read: Best Offer! Samsung Galaxy S23 Ultra वर हजारो रुपयांच्या Discount, डील मिस करू नका
एका प्रसिद्ध टिपस्टरने केलेल्या दाव्यानुसार, CMF फोन 2 प्रो 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. लीकनुसार, CMF फोन 2 प्रो च्या बेस मॉडेलची किंमत 18,999 रुपये असू शकते. तर, 256GB व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपयांपर्यंत असू शकते. एवढेच नाही तर, आगामी फोनसह 1000 रुपयांच्या डिस्काउंट देखील मिळू शकतो.
इतर लीक्सबद्दल बोलायचे झाल्यास, CMF फोन 2 प्रो फोन 3 वर्षांच्या OS अपडेट्स आणि 6 वर्षांच्या Android सुरक्षा पॅचसह येईल. त्यात एक नवीन मॅक्रो कॅमेरा अटॅचमेंट असेल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, CMF Phone 2 Pro मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रो चिपसेटद्वारे समर्थित असल्याची पुष्टी झाली आहे. सध्या, डिस्प्ले किंवा त्याच्या आकाराबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, फोनबद्दल झालेल्या पुष्टीकरणावरून हे स्पष्ट होते की, या डिव्हाइसमध्ये मोठा आणि चमकदार डिस्प्ले असणार आहे.
फोटोग्राफीसाठी, या हँडसेटच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा 2x टेलिफोटो लेन्स आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर मिळेल. आगामी फोनमध्ये नथिंग फोन (3a) सिरीजमध्ये आढळणारे एसेन्शियल स्पेस (एसेन्शियल की) फिचर असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे एक AI -पॉवर्ड हब आहे, ज्याला ब्रँड सेकंड मेमरी म्हणत आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, फोनची योग्य किंमत आणि योग्य फीचर्स लाँचनंतरच पुढे येतील.