Tecno ने लाँच केला आणखी एक उत्कृष्ट स्मार्टफोन, 5000mAh बॅटरीसह मिळतील जबरदस्त फीचर्स

Tecno ने लाँच केला आणखी एक उत्कृष्ट स्मार्टफोन, 5000mAh बॅटरीसह मिळतील जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

Tecno Spark 9T 'या' देशात लाँच

स्मार्टफोनची किंमत भारतीय चलनानुसार सुमारे 14,700 रुपये

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध

ecno ने त्याच्या लोकप्रिय Spark 9 सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Tecno Spark 9T लाँच केला आहे. हा फोन 4 GB + 64 GB आणि 4 GB + 128 GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. कंपनीच्या या बजेट स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity प्रोसेसर आणि 6.6-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. TECNO चा हा फोन नुकताच नायजेरियात लाँच झाला आहे. नायजेरियामध्ये त्याची सुरुवातीची किंमत भारतीय चलनानुसार सुमारे 14,700 रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती… 

हे सुद्धा वाचा : तुमच्यासाठी सर्वोत्तम कॅमेरा आणि बॅटरी असलेले 4 स्मार्टफोन्स, Amazon सेलमध्ये उपलब्ध

Tecno Spark 9T ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

टेक्नो या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD + IPS LCD पॅनल देत आहे. फोनमधील डिस्प्ले लहान सेंटर वॉटरड्रॉप नॉचसह येतो आणि त्याचा रीफ्रेश रेट 60Hz आहे. कंपनीने हा फोन 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजमध्ये लाँच केला आहे. फोनमध्ये कंपनी प्रोसेसर म्हणून MediaTek Dimension G37 चिपसेट देत आहे. 

tecno

कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 13-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. याशिवाय येथे AI लेन्स देखील देण्यात आली आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

याव्यतिरिक्त, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 10W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप C पोर्ट व्यतिरिक्त सर्व स्टॅंडर्ड ऑप्शन्स  मिळतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo