खरंच ! यावेळी फेस्टिव्ह सिझनमध्ये असेल खरी धमाल, स्मार्टफोन्सवर मिळेल बम्पर डिस्काउंट

खरंच ! यावेळी फेस्टिव्ह सिझनमध्ये असेल खरी धमाल, स्मार्टफोन्सवर मिळेल बम्पर डिस्काउंट
HIGHLIGHTS

फेस्टिव्ह सिझनमध्ये स्मार्टफोन्सवर मिळेल बंपर डिस्काउंट

अतिशय आकर्षक EMI वर उपलब्ध असतील फोन

सॅमसंगचे तब्बल 5 कोटी फोन अनसोल्ड

तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर आणखी काही दिवस प्रतीक्षा करा. येत्या फेस्टिव्ह सिझनमध्ये अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन सेल होणार आहेत. यामध्ये तुम्हाला तुमचा आवडता स्मार्टफोन मोठ्या सवलतीत आणि उत्तम ऑफर्ससह खरेदी करता येईल. मार्केट ट्रॅकर्स आणि रिटेलर्सने ही माहिती दिली. वाढती महागाई आणि कमी जागतिक मागणी यामुळे कंपन्यांना जमा झालेला स्टॉक लवकरात लवकर विकायचा असल्याचे सांगण्यात येत आहे. अहवालानुसार, यावेळी मोठ्या कंपन्यांकडे 5 ते 8 कोटी विक्री न झालेले फोन पडून आहेत. स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिटिक्सचे वरिष्ठ विश्लेषक, राजीव नायर यांच्या मते, लवकरच भारतीय बाजारपेठेत मोठे डिस्काउंट ऑफर दिसतील.

अतिशय आकर्षक EMI वर उपलब्ध असतील फोन 

या अहवालात म्हटले आहे की, ब्रँड्स येत्या फेस्टिव्ह सिझनमध्ये वर्षाच्या पहिल्या सहामाहीत झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतील. स्ट्रॅटेजी ऍनालिटिक्सचे दूरसंचार विश्लेषक, अभिलाष कुमार  म्हणाले की, ब्रँड वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी ऑफलाइन आणि त्यांच्या स्वत:च्या वेबसाइटवर आकर्षक EMI योजना देऊ शकतात. आपला वाढत असलेला स्टॉक रिकामं करण्याच्या प्रयत्नात ब्रँड्स असतील.

हे सुद्धा वाचा : VI च्या 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar सब्स्क्रिप्शन मोफत, किंमत फक्त 150 रुपये

ET च्या अहवालानुसार, ऑफलाइन रिटेलर्सन कन्फर्म केले आहे की, इन्व्हेंटरीजमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि स्मार्टफोन ब्रँड्सने जूनमध्ये ऑफलाइन रिटेलर्ससाठी मार्जिन देखील वाढवले ​​आहे. ऑफलाइन रिटेलर्स अधिक मार्जिन मिळाल्यावर वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतात. 

सॅमसंगचे 5 कोटी फोन अनसोल्ड 

देशांतर्गत बाजारपेठेत चिनी स्मार्टफोन कंपन्यांच्या यादीतही लक्षणीय वाढ झाली आहे आणि त्याच वेळी या कंपन्यांना पूर्व युरोपमध्ये हँडसेट विकणे कठीण जात आहे. या यादींची संख्या 5 ते 80 कोटी युनिट्सपर्यंत आहे, असे स्ट्रॅटेजी ऍनालिटिक्सचे संचालक श्रवण यांनी सांगितले. श्रवण पुढे म्हणाले की, कंपन्या यापैकी काही युनिट्स भारतीय बाजारपेठेत सामावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, ही समस्या दूर होण्यास वेळ लागेल कारण भारतातील सर्व युनिट्सची विक्री करणे खूप कठीण होणार आहे. सॅमसंगबद्दल बोलायचे तर, जगभरातील डिस्ट्रिब्युशन स्टॉकमध्ये असे 5 कोटी युनिट्स आहेत, जे अद्याप विकले गेले नाहीत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo