Smartphones Launch This Week: या आठवड्यात भारतात लाँच Vivo, Realme चे नवे फोन्स, पहा यादी

Updated on 21-Apr-2025
HIGHLIGHTS

येत्या आठवड्यात अनेक स्मार्टफोन भारतात येण्यास सज्ज

OPPO K13 5G फोन भारतात 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल.

Realme 14T 5G फोन 25 एप्रिल रोजी भारतात लाँच होईल.

Smartphones Launch This Week: एप्रिल 2025 महिना स्मार्टफोन लाँचसाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. या महिन्याचा तिसरा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यात देखील अनेक नवे फोन्स लाँच होणार आहेत. दर आठवड्याला विविध स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी भारतीय बाजारात त्यांचे नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. त्याचप्रमाणे, येत्या आठवड्यात अनेक स्मार्टफोन भारतात येण्यास सज्ज झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या आठवड्यात लाँच होणारे आगामी फोन्स-

Also Read: Smart TV Deals: 50 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही झाले स्वस्त! किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी

OPPO K13 5G

OPPO K13 5G फोन भारतात 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. कंपनी हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्यास सज्ज झाले आहे. फोनमधील अपेक्षित फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 प्रोसेसर दिला जाईल. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा असेल. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP चा कॅमेरा दिला जाईल. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची 7000mAh बॅटरी असेल.

Vivo T4 5G

आगामी Vivo T4 5G फोन उद्या 22 एप्रिल रोजी भारतात लाँच होईल. आगामी फोनच्या अपेक्षित फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फीचरमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen प्रोसेसर दिला जाईल. यासोबतच, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकेंडरी कॅमेरा असेल. त्याबरोबरच, सेल्फीसाठी तुम्हाला 32MP कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 7300mAh बॅटरी मिळेल.

OPPO A5 Pro 5G

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo चा आगामी स्मार्टफोन OPPO A5 Pro 5G भारतात लाँच होण्यास सज्ज झाला आहे. हा स्मार्टफोन येत्या 24 एप्रिल रोजी भारतात लाँच होणार आहे. फोनमधील अपेक्षित स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन IP69 ऑल-राउंड वॉटरप्रूफिंग फीचरसह येईल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5800mAh बॅटरी मिळेल, ज्यासोबत तुम्हाला 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. मात्र, फोनचे कन्फर्म फीचर्स फोनच्या लाँचयानंतरच पुढे येतील.

Realme 14T 5G

Realme 14T 5G फोन 25 एप्रिल रोजी भारतात लाँच होईल. या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल. आगामी फोनच्या अपेक्षित स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर असेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा असेल. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध असेल. त्याची बॅटरी 6000mAh असेल, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. फोनबद्दल कन्फर्म माहिती लाँचनंतर पुढे येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :