Smartphones Launch This Week: भारतात ‘या’ आठवड्यात लाँच होणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स, IQOO, Samsung चे फोन यादीत समाविष्ट

HIGHLIGHTS

मे महिन्याचा नवीन आठवडा देखील स्मार्टफोन लाँचच्या नावावर होणार आहे.

Samsung, iQOO आणि Motorola सारखे ब्रँड या आठवड्यात अनेक नवीन फोन लाँच करणार

Samsung Galaxy F55 5G फोन येत्या 17 मे रोजी भारतात लाँच केला जाईल.

Smartphones Launch This Week: भारतात ‘या’ आठवड्यात लाँच होणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स, IQOO, Samsung चे फोन यादीत समाविष्ट

मे महिना सुरु झाल्यापासून अनेक Smartphones भारतीय बाजारात लाँच केला गेले आहेत. आत्ताच गेल्या आठवड्यात Google ने गुपचूप आपला Google Pixel 8a फोन लाँच केला. दरम्यान, मे महिन्याचा नवीन आठवडा देखील स्मार्टफोन लाँचच्या नावावर असणार आहे. होय, Samsung, iQOO आणि Motorola सारखे ब्रँड या आठवड्यात अनेक नवीन फोन लाँच करणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पुढील आठवड्यात भारतात कोणते फोन लाँच केले जातील, ते बघुयात-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Motorola Edge 50 Fusion

Motorola Edge 50 Fusion India launch set for May 16: Processor, camera & more revealed
Motorola Edge 50 Fusion

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोन येत्या 16 मे रोजी भारतात लाँच होईल. हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टवर लाँच होण्यापूर्वी फोनचे काही फीचर्स सूचिबद्ध करण्यात आले आहेत. या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह असेल. परफॉर्मन्ससाठी, हा फोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देखील दिला जाईल.

iQOO Z9x 5G

iqoo z9x 5g smartphones launch date in india

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO Z9x 5G स्मार्टफोन 16 मे रोजी भारतात लाँच होईल. हा फोन Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. लाँचपूर्वीच फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 6000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

Samsung Galaxy F55 5G

Samsung Galaxy F55
Samsung Galaxy F55

Samsung Galaxy F55 5G फोन येत्या 17 मे रोजी भारतात लाँच केला जाईल. हा फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाईल, असे देखील उघड करण्यात आले आहे. फोनच्या मागील बाजूस लेदर फिनिश उपलब्ध असेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP सेकंडरी कॅमेरा आणि 2MP तिसरा कॅमेरा असेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असेल.

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile