जानेवारीमध्ये लाँच होऊ शकतो सॅमसंग गॅलेक्सी S7

Updated on 23-Oct-2015
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा असू शकतो. त्याशिवाय ह्यात USB टाइप-C आणि अॅप्पलचे 3D टच वैशिष्ट्यसुद्धा असू शकते.

मोबाईल निर्माता कंपनी  सॅमसंग आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी S7 लाँच करु शकते. खरे पाहता, बातम्यांनुसार सॅमसंग गॅलेक्सी S7 ला कंपनी लवकरात लवकर लाँच करु इच्छिते. ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीसच हा फोन लाँच केला जाऊ शकतो.

 

सॅमसंग गॅलेक्सी S7 स्मार्टफोनच्या लाँचशी संबंधित माहिती कोरियाची वेबसाइट ईटीन्यूजने दिली आहे. वेबसाइटनुसार सॅमसंग गॅलेक्सी S7 ला जानेवारी २०१६ मध्ये लाँच केले जाऊ शकते. ही तीच वेबसाइट आहे ज्याने सॅमसंग गॅलेक्सी नोट ५ आणि गॅलेक्सी S6 एज प्लससंबंधी  सतत माहिती दिली होती. तसेच सॅमसंग गॅलेक्सी S7 दोन आवृत्यांमध्ये उपलब्ध होईल अशीही माहिती मिळतेय.

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ईपॉप चिप असू शकते. हा कमी सिग्नल क्षेत्रातही उत्कृष्ट काम करेल. ह्याचा उपयोग पहिल्यांदा गॅलेक्सी S6 आणि S6 एजमध्ये केला गेला होता. काही अन्य लीक्सनुसार ह्या स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा असू शकतो. त्याशिवाय हा USB टाइप-C आणि अॅप्पलच्या 3D टच वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल.

हल्लीच सॅमसंगने भारतीय बाजारात आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन्स गॅलेक्सी नोट ५ आणि सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लस लाँच केले होते.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :