मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने आपले दोन नवीन स्मार्टफोन्स गॅलेक्सी ऑन५ आणि गॅलेक्सी ऑन७ला भारतात अधिकृत वेबसाइटच्या यादीत समाविष्ट केले आहे. जरी कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ऑन५ स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धतेच्या संबंधी कोणती विशेष माहिती दिली नसली, तरीही कंपनीचा दावा आहे की, ‘स्लीक डिझाईन’ असलेल्या नवीन गॅलेक्सी ऑन५ स्मार्टफोनच्या कॅमे-याने ‘जास्त ब्राइट आणि डिटेल फोटोज’ घेऊ शकता.
सॅमसंग गॅलेक्सी ऑन५ च्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD TFT डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन ७२०x१२८० पिक्सेल आहे. त्याचबरोबर ह्यात १.३GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GBची रॅम दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GBचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने १२८ जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे आणि ह्याने आपण पुर्ण HD (१०८० पिक्सेल) रिझोल्युशनचे व्हिडियो रेकॉर्ड करु शकतो.
हा स्मार्टफोन 4G LTE ला सपोर्ट करतो. ह्यात एक्सेलेरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिले गेले आहेत. गॅलेक्सी ऑन५मध्ये २६००mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ, GPS,ग्लोनास, मायक्रो-USB, 3G,GPRS/एज आणि वाय-फाय 802.11 B/G/N वैशिष्ट्य आहे. हा हँडसेट ब्लॅक आणि सोनेरी रंगात उपलब्ध होईल.
तेथेच जर सॅमसंग गॅलेक्सी ऑन7 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्याला कंपनीच्या सपोर्ट साइटवर लिस्ट केले आहे. मात्र ह्या लिस्टिंगमध्ये ह्याचा कोणताही तपशील दिलेला नाही. ह्या हँडसेटला SM-G600FY मॉडल नावासोबत लिस्ट केले गेले आहे.