सॅमसंग गॅलेक्सी ऑन5 आणि ऑन7 लाँच

Updated on 04-Nov-2015
HIGHLIGHTS

हे दोन्ही स्मार्टफोन एक्सक्लूसिव्हली ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील. भारतीय बाजारात गॅलेक्सी ऑन५ची किंमत ८,९९० रुपये आहे. तर गॅलेक्सी ऑन ७ ची किंमत १०,९९० रुपये आहे.

मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग आज आपले दोन स्मार्टफोन्स गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7 लाँच केले. खरे पाहता सॅमसंगने आज दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमांतर्गत हे स्मार्टफोन्स लाँच केले. हे दोन्ही स्मार्टफोन एक्सक्लूसिव्हली ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील. भारतीय बाजारात गॅलेक्सी ऑन५ची किंमत ८,९९० रुपये आहे. तर गॅलेक्सी ऑन ७ ची किंमत १०,९९० रुपये आहे.

 

जर गॅलेक्सी ऑन५च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. ह्यात 1.3Ghz क्वाड-कोर प्रोसेसर आणि १.५जीबीची रॅम दिली गेली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ८जीबीच्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.

त्याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी ऑन5 मध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा २६००mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हीटीसाठी ह्यात वायफाय, ब्लूटुथ, GPS, 4G LTE आणि 3G समाविष्ट आहे.

तर गॅलेक्सी ऑन 7 मध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ह्यात 1.2GHz क्वाड-कोर एक्सनोस ३४७५ प्रोसेसरसह १.५ जीबीचा रॅम असेल. ह्या स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट स्टोरेज 8GB आहे आणि ह्यात मायक्रो-एसडी कार्ड (१२८जीबी पर्यंत) साठी सपोर्ट आहे. गॅलेक्सी ऑन 7 मध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरासुद्धा आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ५.१ लॉलीपॉपवर चालतो. गॅलेक्सी ऑन7 मध्ये 3000mAh बॅटरी दिली गेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटुथ, GPS, ग्लोनास, मायक्रो-USB, 3G, 4G LTE, GPRS/एज आणि वायफाय ८०२.११ B/G/N फीचर आहे.

फ्लिपकार्टवर 8990 रुपयांत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी ऑन5

फ्लिपकार्टवर 10990 रुपयांत खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी ऑन7

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :