Samsung Galaxy M53 वर मिळतोय भारी डिस्काउंट, अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा

Updated on 27-Mar-2023
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M53 प्रचंड सवलतीसह उपलब्ध

फक्त 2,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

Amazon वर या स्मार्टफोनवर EMI चा पर्याय देखील मिळत आहे.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट तुम्हाला साथ देत नसेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तुम्ही कमी किमतीत Samsung Galaxy M53 सहज खरेदी करू शकता. यामध्ये अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील समाविष्ट आहेत. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही Samsung Galaxy M53 कमी किंमतीत कसा खरेदी करू शकता आणि त्यावरील ऑफर्स कसे मिळवू शकता. 

किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy M53 ची मूळ किंमत 32999 रुपये आहे. परंतु तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून 21 टक्के सूट देऊन 25,999 रुपयांना सहज खरेदी करू शकता. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर कमी किमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही या स्मार्ट फोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. येथून खरेदी करा  

एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला जुन्या फोनच्या बदल्यात 23,000 हजार रुपयांचा फायदा मिळत आहे. एक्सचेंज व्हॅल्यूचे संपूर्ण लाभ मिळाल्यानंतर तुम्हाला स्मार्टफोन फक्त 2,999 रुपयांमध्ये मिळत आहे. याशिवाय, ग्राहकांच्या सोयीसाठी, तुम्हाला या स्मार्टफोनवर EMI चा पर्याय देखील मिळत आहे. यासाठी 1,242 रुपयांपर्यंत मंथली पेमेंट करावे लागेल.

Samsung Galaxy M53 चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंच लांबीचा फुल HD प्लस डिस्प्ले मिळत आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 900 chipset ने सुसज्ज आहे. कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. यामध्ये प्राइमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल, सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :