भारीच की! 50MP कॅमेरासह Samsung Galaxy M14 4G फोन भारतात लाँच, किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी। Tech News

 भारीच की! 50MP कॅमेरासह Samsung Galaxy M14 4G फोन भारतात लाँच, किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी। Tech News
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M14 4G स्मार्टफोन भारतात लाँच

हा स्मार्टफोन कंपनीने बजेट रेंजमध्ये सादर केला आहे.

हा फोन Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

Samsung कंपनीने Samsung Galaxy M14 4G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 6GB रॅम उपलब्ध आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यासोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची किंमत, उपलब्धता आणि सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: Most Affordable 5G Smartphone: नव्या Airtel Prepaid Bundle पॅकसह Poco M6 5G स्मार्टफोन लाँच, बघा किंमत। Tech News

 Samsung Galaxy M14
Samsung Galaxy M14

Samsung Galaxy M14 4G ची भारतीय किंमत

कंपनीने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलसाठी Samsung Galaxy M14 4G स्मार्टफोनची किंमत 8,499 रुपये ठेवली आहे. त्याबरोबरच, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. हा फोन खरेदीसाठी Amazon India वर लिस्ट करण्यात आला आहे. फोनमध्ये आर्क्टिक ब्लू आणि सॅफायर ब्लू हे दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy M14 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M14 4G launched 2024
Samsung Galaxy M14 4G launched 2024

Samsung Galaxy M14 4G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ PLS LCD डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4GB रॅम आणि 6GB रॅम सपोर्ट उपलब्ध आहे. यासोबत 6GB व्हर्चुअल रॅमसाठी सपोर्ट आहे. फोनचे स्टोरेज 64GB आणि 128GB आहे, जे मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येते. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP, 2MP सेकंडरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ड्युअल-सिम कार्ड स्लॉट, 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.2, GPCS आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo