Most Affordable 5G Smartphone: नव्या Airtel Prepaid Bundle पॅकसह Poco M6 5G स्मार्टफोन लाँच, बघा किंमत। Tech News 

Most Affordable 5G Smartphone: नव्या Airtel Prepaid Bundle पॅकसह Poco M6 5G स्मार्टफोन लाँच, बघा किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Poco M6 5G स्मार्टफोन Airtel Prepaid Bundle सह लाँच करण्यात आला आहे.

Poco India ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवरून याबद्दल माहिती दिली.

Poco ने Airtel पार्टनरशिपसह भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला आहे.

Poco M6 5G स्मार्टफोन Airtel Prepaid Bundle सह सादर करण्यात आला आहे. यासह हा भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन बनला आहे. कंपनीने हा फोन गेल्या वर्षी 2023 डिसेंबरमध्ये लाँच केला होता. Poco India ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवरून याबद्दल माहिती दिली आहे की, Poco ने Airtel पार्टनरशिपसह भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Poco M6 5G फोनच्या नवीन मॉडेलशी संबंधित सर्व तपशील.

हे सुद्धा वाचा: बहुप्रतीक्षित Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन अखेर भारतीय बाजारात लाँच, बघा टॉप 5 Powerful फिचर्स। Tech News

Airtel Prepaid Bundle सह Poco M6 5G

अलीकडेच, POCO इंडियाच्या प्रमुखाने या लाँचबद्दल माहिती दिली होती की, लवकरच भारतात सर्वात स्वस्त 5G फोन लॉन्च केला जाईल.

वर सांगितल्याप्रमाणे, Poco India ने अधिकृतपणे Airtel Prepaid Bundle सह फोन लाँच केल्याची माहिती दिली आहे. हा फोन म्हणजेच Poco M6 5G स्मार्टफोन होय. कंपनीने हा फोन 8,799 रुपयांना सादर केला आहे. हा फोन Flipkart वर 10 मार्चपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल. कंपनीने या फोनला सर्वात स्वस्त 5G फोन म्हणून संबोधले आहे.

Poco M6 5G च्या Airtel च्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनसह Airtel प्रीपेड ग्राहकांना मोबाईल रिचार्जवर एक वेळ 50GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त, नॉन-Airtel ग्राहक डोर-स्टेप सिम डिलिव्हरीसाठी देखील अर्ज करू शकतात. या सिमसह त्यांना 50GB डेटाचा लाभही मिळणार आहे.

Poco M6 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

poco m6 5g features

Poco M6 5G फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. स्पीड , फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट मिळेल. हा फोन Android 13-आधारित MIUI 14 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo