केवळ २,९९९ रुपयात मिळतोय रिलायन्स 4G फोन आणि तेही ३ महिन्याच्या अनलिमिटेड डाटासह

केवळ २,९९९ रुपयात मिळतोय रिलायन्स 4G फोन आणि तेही ३ महिन्याच्या अनलिमिटेड डाटासह
HIGHLIGHTS

रिलायन्सचे सर्व लाइफ फोन्स 4G सपोर्टसह येत आहेत आणि आता ह्याच्या किंमतीतही घट झाली आहे.

ही बातमी डाटा प्रेमींसाठी फारच महत्त्वाची आहे. कारण रिलायन्सने आपल्या LYF ब्रँड स्मार्टफोन्सच्या किंमतीत घट केली आहे. एका मोठ्या ग्रुप नुसार, रिलायन्स ने आपल्या LYF स्मार्टफोन्सच्या किंमतीत घट केली आहे. आणि ही नवी किंमत मंगळवारपासून सर्व डिलर्स लागू करण्याचे आदेश दिले आहेत. रिलायन्सचा LYF वॉटर 2 स्मार्टफोन आता केवळ ९,४९९ रुपयात मिळत आहे. ह्या स्मार्टफोनच्या किंमतीत ४००० रुपयांची घट केली आहे. आता हा स्मार्टफोन १३,४९९ रुपयात लाँच केला गेला होता. त्याशिवाय LYF विंड 6 स्मार्टफोनच्या किंमतीतही ५०० रुपयाची घट केली आहे. आता ह्या स्मार्टफोनची किंमत ५,९९९ रुपये करण्यात आली आहे. लाँचवेळी ह्या स्मार्टफोनची किंमत ६,४९९ रुपये होती. तसेच LYF फ्लेम 2 च्या किंमतीतही १,३०० रुपयाची घट केली आहे. आता हा फोन ३,४९९ रुपयात मिळत आहे.

त्याशिवाय रिलायन्सच्या काही अन्य स्मार्टफोनच्या किंमतीतही घट केली आहे. जसे LYF फ्लेम 4, फ्लेम 5 आणि फ्लेम 6 च्या किंमतीत १००० रुपयांची घट केली आहे आणि आता हे स्मार्टफोन्स केवळ २,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे.

हेदेखील वाचा – ३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स

तसेच रिलायन्सने न केवळ ह्या स्मार्टफोनच्या किंमतीत घट केली आहे तर, ह्या स्मार्टफोन्ससह चक्क ३ महिन्यांचा मोफत डाटा देत आहे. म्हणजेच जर आपण रिलायन्स LYF फोन २,९९९ रुपयात खरेदी केला तर आपल्याला ३ महिन्यासाठी अनलिमिटेड डाटा मिळणार आहे.

 

हेदेखील वाचा- CG slate gamified लर्निंग टॅबलेट भारतात लाँच , किंमत ८,४९९ रुपये

हेदेखील वाचा- आता ४५ भाषांमध्ये ट्रान्सलेट करणार फेसबुकचे हे नवीन कंपोजर फिचर

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo